चुटकीसरशी करा WhatsApp व्हिडीओ कॉल रेकॉर्ड; जाणून घ्या सर्वात सोप्पी पद्धत
By सिद्धेश जाधव | Published: May 9, 2022 01:06 PM2022-05-09T13:06:29+5:302022-05-09T13:07:50+5:30
How To Record Whatsapp Video Call: व्हॉट्सअॅपवरील व्हिडीओ कॉल्स सोप्प्या पद्धतीनं रेकॉर्ड करता येतात, याची सोप्पी पद्धत पुढे दिली आहे.
Whatsapp नं व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी सदस्यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे अनेकजण ऑनलाईन मिटींग्ससाठी लोकप्रिय मेसिजिंग अॅपचा वापर करत आहेत. परंतु व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करण्याचा पर्याय मिळत नाही. जर तुम्हाला व्हॉट्सअॅप व्हिडीओ व व्हॉइस कॉल रेकॉर्ड करायचा असेल तर पुढे आम्ही एक सोप्पी पद्धत सांगितली आहे. जिच्या मदतीनं तुम्ही अँड्रॉइड किंवा आयओएसवर देखील ऑडियो आणि व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करू शकता.
व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल रेकॉर्डिंग
इंटरनल स्क्रीन रिकॉर्डिंग ऑडियोसह व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करण्याची सर्वात चांगली पद्धत आहे, जी iPhone आणि काही Android डिवाइसमध्ये उपलब्ध असते. तुमच्या स्मार्टफोनमध्ये ही सोय नसल्यास तुम्ही थर्ड पार्टी स्क्रीन रेकॉर्डिंग अॅप इन्स्टॉल करून त्याचा वापर करू शकता.
अँड्रॉइड फोनमध्ये असा करा व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल रेकॉर्ड
अँड्रॉइड फोन युजर्स इंटरनल किंवा थर्ड पार्टी स्क्रीन रेकॉर्डिंग अॅपचा वापर करून व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करू शकतात. Android 10 वरील ऑपरेटिंग सिस्टममध्ये -इन स्क्रीन रेकॉर्डर मिळतो. तो वापरण्यासाठी तुमच्या फोनचा स्क्रीन रेकॉर्डर डॅशबोर्ड किंवा क्विक सेटिंग मेनू ओपन करा. त्यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन मायक्रोफोन ऑडियोसह स्क्रीन रेकॉर्ड करण्याचा पर्याय निवडा. व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करताना किंवा सुरु अस्तंत रेकॉर्डवर क्लिक करा आणि रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यावर बंद करा.
थर्ड पार्टी अॅप्स
तुमच्या स्मार्टफोनमध्ये सिस्टम स्क्रीन रेकॉर्डर नसल्यास तुम्ही Google Play स्टोरवरून XRecorder किंवा AZ Screen Recorder सारखे थर्ड पार्टी अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्सना स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी कॅमेरा, मायक्रोफोन इत्यादी आवश्यक परवानग्या द्याव्या लागतील. तिथून देखील तुम्ही कॉल करण्यापूर्वी किंवा कॉल सुरु असताना रेकोर्डिंग करू शकता.
iPhone वर अशाप्रकारे करा व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल रेकॉर्ड
Apple नं iOS 11 च्या पुढील ऑपरेटिंग सिस्टममध्ये बिल्ट-इन स्क्रीन रेकॉर्डर दिल्यामुळे iPhone युजर्सना जास्त खटाटोप करावा लागत नाही. आयफोनच्या होम स्क्रीनच्या खालच्या बाजूला स्वाईप केल्यावर स्क्रीन रेकॉर्डिंगचा पर्याय मिळेल. इथे ऑप्शन नसल्यास कंट्रोल सेंटरच्या सेटिंगमधून स्क्रीन रेकॉर्डिंग अॅक्टिव्ह करता येईल. त्यानंतर स्क्रीन रेकॉर्डिंग आयकॉन टॅप करा आणि व्हॉट्सअॅप लाँच करून व्हिडीओ कॉल करा म्हणजे तो कॉल रेकॉर्ड होईल.
नोट: समोरच्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय फोन कॉल रेकॉर्ड करणं बेकायदेशीर आहे, कोणतंही रेकॉर्डिंग करण्यापूर्वी सर्व सहभागी लोकांची परवानगी घ्यावी.