Instagram वरून फोटो, व्हिडीओ किंवा रील डिलीट झाली आहे? अशी परत मिळवा पोस्ट

By सिद्धेश जाधव | Published: April 25, 2022 07:56 PM2022-04-25T19:56:01+5:302022-04-25T19:56:13+5:30

Instagram वरून डिलीट झालेला फोटो किंवा व्हिडीओ काही दिवसांच्या कालावधीत पुन्हा मिळवता येतो.  

How To Restore Recently Deleted Photo Video and Story On Instagram   | Instagram वरून फोटो, व्हिडीओ किंवा रील डिलीट झाली आहे? अशी परत मिळवा पोस्ट

Instagram वरून फोटो, व्हिडीओ किंवा रील डिलीट झाली आहे? अशी परत मिळवा पोस्ट

googlenewsNext

रिल्स व्हिडीओचं फिचर आल्यामुळे Instagram चा वापर मोठ्याप्रमाणावर वाढला आहे. आता हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फक्त फोटो शेयर करण्यासाठी वापरला जात नाही. कंपनीला देखील ती ओळख नको आहे. लोक फोटोज सोबतच व्हिडीओ, स्टोरी स्टेटस आणि रील्स शेयर करत आहेत. बऱ्याचदा या पोस्ट्स चुकून डिलीट होतात आणि त्या आता पुन्हा मिळणार नाहीत असं वाटतं.  

परंतु इंस्टाग्रामवरील डिलीट केलेला सर्व कंटेंट तुम्हाला परत मिळवता येतो. जरी तुमच्या प्रोफाइलवर दिसत नसला तरी हा कंटेंट Recently Deleted फोल्डरमध्ये जातो. तुम्ही काही दिवसांनी देखील या पोस्ट पुन्हा Restore करू शकता. जर तुम्ही स्टोरी डिलीट केली असेल तर तुम्ही ती 24 तासांच्या आताच रिस्टोर करू शकता. परंतु अन्य कंटेंट डिलिट केल्यापासून 30 दिवस Instagram च्या Recently Deleted सेक्शनमध्ये ठेवला जातो. त्यानंतर मात्र ती पोस्ट कायमची डिलीट केली जाते.  

अशाप्रकारे पुन्हा मिळवा इंस्टग्रामवरून डिलीट केलेला कंटेंट  

  • सर्वप्रथम Instagram अ‍ॅप ओपन करा आणि खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात Profile आयकॉनवर क्लिक करा. 
  • त्यांनतर वरच्या बाजूला उजवीकडे असलेल्या 3 लाईन्सवर क्लिक करा. 
  • इथे असलेल्या ऑप्शन्स पैकी Your Activity ची निवड करा. 
  • खाली स्क्रॉल करून ‘recently deleted’ ऑप्शनवर क्लिक करा. 
  • इथे तुम्हाला अलीकडे डिलीट करण्यात आलेला कंटेंट मिळेल. 
  • यातील जी पोस्ट रीस्टोर करायची असेल त्यावर क्लिक करा. 
  • उजवीकडे असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक केल्यावर डिलीट आणि Restore ऑप्शन्स मिळतील. 
  • Restore वर क्लिक करून कन्फर्मेशनसाठी पुन्हा एकदा Restore वर क्लिक करा. 
  • अशाप्रकारे इंस्टाग्रामवरून डिलीट केलेला कंटेंट तीस दिवसांच्या आत पुन्हा मिळवता येईल. जर तुम्हाला काही काळ एखादी पोस्ट तुमच्या प्रोफाइलवर दाखवायची नसेल तर तुम्ही पोस्ट ‘Archive’ करू शकता.  

Web Title: How To Restore Recently Deleted Photo Video and Story On Instagram  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.