फोनच्या हॉटस्पॉटला कसे सुरक्षित ठेवाल?; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 12:39 PM2023-01-08T12:39:44+5:302023-01-08T12:41:10+5:30

हॉटस्पॉट सेट करताना, तुमच्याकडे डब्ल्यूपीए२ - पर्सनल, डब्ल्यूपीए२ / डब्ल्यूपीए३ - पर्सनल असे अनेक पर्याय असतील.

How to secure phone hotspot?; Lets Know | फोनच्या हॉटस्पॉटला कसे सुरक्षित ठेवाल?; जाणून घ्या...

फोनच्या हॉटस्पॉटला कसे सुरक्षित ठेवाल?; जाणून घ्या...

googlenewsNext

सार्वजनिक वाय-फायशी कनेक्ट करण्यापेक्षा मोबाइल डेटाद्वारे हॉटस्पॉट वापरणे अधिक सुरक्षित आहे. सार्वजनिक नेटवर्कवरून सायबर हल्ले आणि माहिती चोरीचा धोका असतो. त्यामुळे शक्यतो सार्वजनिक वाय-फायचा वापर टाळा. बघूया फोनच्या हॉटस्पॉटला कसे सुरक्षित ठेवाल... 

सुरक्षा प्रोटोकॉल

हॉटस्पॉट सेट करताना, तुमच्याकडे डब्ल्यूपीए२ - पर्सनल, डब्ल्यूपीए२ / डब्ल्यूपीए३ - पर्सनल असे अनेक पर्याय असतील. डब्ल्यूपीए३ हा सुरक्षित पर्याय आहे. डिव्हाइसमध्ये हा पर्याय नसल्यास दुसरा पर्यायही निवडू शकता. ड्रॉप-डाउन मेनूमध्ये ‘ओपन’ पर्याय निवडू नका, अन्यथा कोणालाही पासवर्डशिवाय हॉटस्पॉटशी कनेक्ट होता येईल. 

व्हीपीएन इन्स्टॉल करा 

व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) हे डिव्हाइसवरून ट्रॅफिक एन्क्रिप्ट करते. तुमची माहिती इतरांपासून लपवते. 

एसएसआयडी बदला 

हॉटस्पॉट सेट करताना, सर्व्हिस सेट आयडेंटिफायर (एसएसआयडी) बदलणे आवश्यक आहे. हे तुमच्या नेटवर्कचे नाव आहे. स्मार्टफोनद्वारे स्वयंचलितपणे नियुक्त केलेले नाव वापरू नये. 

अँटिव्हायरस सॉफ्टवेअर  

स्मार्टफोनला मालवेअरचा जास्त धोका असतो. त्यामुळे फोनमध्ये दर्जेदार अँटिव्हायरस असावे. 

कठीण पासवर्ड   

कोणीही सहजासहजी क्रॅक करू शकणार नाही, तसेच विसरणार नाहीत, असा पासवर्ड हॉटस्पॉटसाठी सेट करा.

Web Title: How to secure phone hotspot?; Lets Know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल