घराच्या सिक्युरिटीसाठी जुन्या फोनला बनवा सीसीटीव्ही कॅमेरा, जाणून घ्या काय करावं लागेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 03:58 PM2024-07-29T15:58:54+5:302024-07-29T16:02:36+5:30

अनेकांना हे माहीत नाही की, ते त्यांच्या या जुन्या फोनचा वापर सीसीटीव्ही कॅमेरासारखा करू शकता. तो कसा करायचा हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

How to set your old phone to a cctv camera for your home Security | घराच्या सिक्युरिटीसाठी जुन्या फोनला बनवा सीसीटीव्ही कॅमेरा, जाणून घ्या काय करावं लागेल!

घराच्या सिक्युरिटीसाठी जुन्या फोनला बनवा सीसीटीव्ही कॅमेरा, जाणून घ्या काय करावं लागेल!

स्मार्टफोनचा आजकाल सगळेच करतात. मोबाइलशिवाय जास्तीत जास्त लोकांचं एकही काम पूर्ण नाही. अशात मोबाईल फोनचं मार्केट जोरात आहे. रोज किंवा एक दिवसाआड नवनवीन फोन लॉन्च होत असतात. काही लोक हौशीही इतके असतात की, दर सहा महिन्यांनी आपला फोन बदलतात. अशात अनेकांचे जुने चांगल्या कंडिशनमधील फोन असेच पडून असतात. पण अनेकांना हे माहीत नाही की, ते त्यांच्या या जुन्या फोनचा वापर सीसीटीव्ही कॅमेरासारखा करू शकता. तो कसा करायचा हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

एका स्मार्टफोनच्या माध्यमातून जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून तुम्ही घर आणि ऑफिसवर लक्ष ठेवू शकता. आम्ही अशाच एका अ‍ॅपबाबत तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही स्मार्टफोनचा वापर सिक्युरिटी कॅमेरासारखा करु शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये  IP Webcam हे अॅप डाऊनलोड करावं लागेल.

IP Webcam अ‍ॅप कसं करेल काम ?

1)  IP Webcam अ‍ॅप आधी गुगल प्ले स्टोरवरुन डाऊनलोड करा. अ‍ॅप ओपन करण्याआधी फोनच्या सेटिंगमध्ये जा. त्यात तुम्हाला सगळे अ‍ॅप दिसतील. त्यानंतर तुमच्या फोनमध्ये जितकेही कॅमेरा अॅप आहेत ते फोर्स स्टॉप करा. नंतर  IP Webcam अ‍ॅप ओपन करा. 

2) ते ओपन केल्यावर प्लग-इनचा पर्याय सेलेक्ट करुन त्यावर टॅप करा. त्यात देण्यात आलेले सगळे फिचर्स इन्स्टॉल करा. फिचर्स इन्स्टॉल केल्यानंतर सर्वच फिचर्स ऑन करा. यातील एकही फिचर ऑफ राहिल्यास हे अ‍ॅप काम करणार नाही. 

3) आता अ‍ॅपमध्ये जाऊन खाली देण्यात आलेल्या start server पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर ओपन होणाऱ्या विंडोला yes करा. 

4) विंडोमध्ये Webcam चा IP अ‍ॅड्रेस येईल. तो कॉपी करुन त्या फोन किंवा PC मध्ये टाका ज्यावर लाईव्ह व्हिडीओ बघायचा आहे.

5) त्या ब्राऊजरवर IP अ‍ॅड्रेस टाकून एंटर करा. त्यानंतर एक विंडो ओपन होईल. त्या ब्राऊजरवर टॅप करा तुम्हाला लाईव्ह व्हिडीओ दिसायला लागेल.

Web Title: How to set your old phone to a cctv camera for your home Security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.