मस्तच! WhatsApp स्टेटसवर शेअर करा HD फोटो आणि Video; आता येणार 'फुल टू मजा'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 04:17 PM2023-12-10T16:17:21+5:302023-12-10T16:18:15+5:30
WhatsApp ने अलीकडेच हाय डेफिनेशन म्हणजेच HD क्वालिटीमध्ये फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग अपडेट दिलं आहे. यानंतर आता WhatsApp नवीन अपडेटसह HD फोटो व्हिडिओचे स्टेटस अपडेट करण्याचा पर्याय देत आहे.
WhatsApp युजर्ससाठी आता खूशखबर आहे. WhatsApp ने अलीकडेच हाय डेफिनेशन म्हणजेच HD क्वालिटीमध्ये फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग अपडेट दिलं आहे. यानंतर आता WhatsApp नवीन अपडेटसह HD फोटो व्हिडिओचे स्टेटस अपडेट करण्याचा पर्याय देत आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या WhatsApp स्टेटसवर एचडी फॉरमॅटमध्ये फोटो आणि व्हिडीओ शेअर करू शकाल.
जेव्हा स्टेटसमध्ये फोटो आणि व्हिडीओ शेअर केलं जातं तेव्हा त्याची क्वालिटी खराब होते. मात्र, आता WhatsApp वर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना त्याची क्वालिटी खराब होणार नाही. नवीन HD फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग फीचर अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.23.26.3 साठी जारी करण्यात आले आहे.
यामध्ये जेव्हा तुम्ही WhatsAppस्टेटस शेअर करता तेव्हा तुम्हाला HD आयकॉन दिसेल, ज्याच्या मदतीने तुम्ही HD फोटो आणि व्हिडीओ स्टेटस शेअर करू शकाल. WhatsApp चे एचडी स्टेटस हे फीचर बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. सध्या बीटा टेस्टर यांचा वापर करू शकतात. मात्र, लवकरच हे फीचर सर्वसामान्य युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाईल, अशी अपेक्षा आहे.
HD फोटो-व्हिडीओ शेअरिंग फीचर कसं वापरायचं?
- सर्वप्रथम तुम्हाला WhatsApp अपडेट करावे लागेल. म्हणजे, तुम्हाला Google Play Store वरून WhatsApp डाउनलोड करावं लागेल.
- यानंतर WhatsApp ओपन करा.
- बीटा टेस्टर सेक्शनमध्ये जा. यासाठी तुम्हाला WhatsApp पेज खाली स्क्रोल करावं लागेल.
- त्यानंतर जॉईन ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- बीटा टेस्टरनंतर अपडेट चेक करा.