Google गुपचूप तुमचं बोलणं ऐकतंय?; 'या' ट्रिकने एका मिनिटात जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 06:00 PM2024-08-15T18:00:48+5:302024-08-15T18:11:22+5:30
गुगल वेळोवेळी आपल्या युजर्सना अनेक नवीन फीचर्स देत आहे. काही फीचर्स दिसतात तर काही हिडन असतात .
गुगलवर अनेक हिडन फीचर्स आहेत, ज्याबद्दल लोकांना माहिती नाही. अनेक वेळा गुगल तुमचं बोलणं गुपचूप ऐकत असतो. अशा परिस्थितीत तुम्ही सेटिंगमध्ये थोडासा बदल करून तुमची प्रायव्हसी सुरक्षित ठेवणं महत्त्वाचं आहे.
गुगलच्या मते, जेव्हा व्हॉइस आणि ऑडिओ ॲक्टिव्हिटी सेटिंग्ज बंद केल्या जातात, तेव्हा Google सर्च, असिस्टंट आणि मॅप्स यांच्यासोबत केल्य़ा जाणाऱ्या इंटरएक्शनमधून मिळालेले व्हॉइस इनपुट तुमच्या Google अकाऊंटमध्ये सेव्ह होत नाही.
गुगल वेळोवेळी आपल्या युजर्सना अनेक नवीन फीचर्स देत आहे. काही फीचर्स दिसतात तर काही हिडन आहेत. अनेक फीचर्सही डेटा आणि प्रायव्हसीशी देखील संबंधित आहेत, जी तुमच्या वेब आणि एप एक्टिव्हिटीमधून ऑडिओ रेकॉर्डिंग कलेक्ट करतात.
गुगलचं म्हणणं आहे की, ते केवळ कमांड्स ऐकण्यासाठी आणि मार्केटिंग एफर्ट्सना प्रोत्साहन देण्यासाठी हे करत आहेत. पण याकडे प्रायव्हसीचं उल्लंघन म्हणूनही पाहिले जात आहे. गुगल डेटा आणि प्रायव्हसी अंतर्गत ते कंट्रोल करण्याचा पर्याय देखील देतं. याच्या मदतीने तुम्ही व्हॉइस आणि ऑडिओ ॲक्टिव्हिटी ऑन किंवा ऑफ करू शकता.
सर्वप्रथम, तुमच्या Android फोन किंवा टॅब्लेटमध्ये सेटिंग्ज ओपन करा आणि नंतर Google वर जा. यानंतर Manage your Google account वर क्लिक करा आणि नंतर Data & privacy वर जा. यानंतर History settings मध्ये Web & App Activity वर टॅप करा. Include voice and audio activity बॉक्स अनचेक करा.