मोबाईल फ्लाईट मोडवर न टाकता असे बंद करा कॉल्स; चॅटिंग, गेमिंग आणि बिंज वॉचिंगमध्ये येणार नाही व्यत्यय

By सिद्धेश जाधव | Published: March 24, 2022 03:21 PM2022-03-24T15:21:14+5:302022-03-24T15:21:31+5:30

तुम्ही तुमचा स्मार्टफोन फ्लाईट मोडवर न टाकता कॉल्स टाळू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही सेटिंग्स बदलाव्या लागतील.  

How To Stop Incoming Calls Without Flight Mode On Check 2 Methods   | मोबाईल फ्लाईट मोडवर न टाकता असे बंद करा कॉल्स; चॅटिंग, गेमिंग आणि बिंज वॉचिंगमध्ये येणार नाही व्यत्यय

मोबाईल फ्लाईट मोडवर न टाकता असे बंद करा कॉल्स; चॅटिंग, गेमिंग आणि बिंज वॉचिंगमध्ये येणार नाही व्यत्यय

Next

अनेकदा आपल्याला आपला स्मार्टफोन वापरायचा असतो परंतु कॉल्स नकोसे वाटतात. मग तुम्ही गेमिंग करत असाल, चॅटिंग करत असाल किंवा एखादा आवडीचा चित्रपट बघताना कॉल्सचा त्रास होतोच. अशावेळी फ्लाईट मोडवर देखील फोन टाकता येत नाही कारण त्यामुळे तुमच्या वाय-फाय नसेल तर इंटरनेट बंद होऊ शकतं. अशावेळी तुम्ही दोन पद्धतीनं कॉल्स टाळू शकता.  

या सेटिंग्स बदला 

अशाप्रकारे कॉल्स टाळण्यासाठी तुम्ही फोनच्या कॉल सेटिंग्समध्ये बदल करू शकता. सेटिंग्समध्ये जाऊन ‘कॉल फॉरवर्डिंग’ ऑप्शनवर क्लिक करा. ईथे तुम्हाला ‘अल्वेज फॉरवर्ड’, ‘फॉरवर्ड व्हेन बिझी’ आणि ‘फॉरवर्ड व्हेन अनआंसर्ड’, असे तीन पर्याय मिळतील. यातील ‘अल्वेज फॉरवर्ड’ ची निवड करा. त्यानंतर एखादा बंद असलेला नंबर टाका आणि ‘इनेबल’ वर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला येणारे कॉल्स त्या बंद नंबरवर जातील.  

दुसऱ्या पद्धतीमध्ये ‘कॉल बारिंग’ पर्याय वापरावा लागेल. त्यासाठी तुमच्या कॉल सेटिंग्समध्ये जाऊन हा ऑप्शन निवडा. त्यानंतर ‘ऑल इनकमिंग कॉल्स’ ची निवड करा आणि त्यानंतर ‘कॉल बारिंग’ पासवर्ड टाका. डिफॉल्ट पासवर्ड 0000 किंवा 1234 असू शकतो. आता नको असलेल्या कॉल्स पासून सुटका करून घेण्यासाठी ‘टर्न ऑन’ ऑप्शनवर क्लीक करा.  तुम्ही जेव्हा पुन्हा कॉल्स घेण्यासाठी तयार व्हाल तेव्हा या सेटिंग्स पूर्ववत करण्यास विसरू नका. 

Web Title: How To Stop Incoming Calls Without Flight Mode On Check 2 Methods  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.