बंद असलेला फोन देखील करता येईल ट्रॅक; Smartphone हरवल्यास वापरा या सोप्प्या ट्रिक्स

By सिद्धेश जाधव | Published: January 31, 2022 06:55 PM2022-01-31T18:55:12+5:302022-01-31T18:56:02+5:30

स्मार्टफोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास काही सोप्प्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचा फोन सहज ट्रॅक करू शकता. या ट्रिक्स वापरून तुम्ही iPhone आणि अँड्रॉइड डिवाइसेज ट्रॅक करू शकतो.  

How To Track Missing Or Stolen Smartphone With Even When Phone Is Switched Off Tricks For Both iOS And Android  | बंद असलेला फोन देखील करता येईल ट्रॅक; Smartphone हरवल्यास वापरा या सोप्प्या ट्रिक्स

बंद असलेला फोन देखील करता येईल ट्रॅक; Smartphone हरवल्यास वापरा या सोप्प्या ट्रिक्स

Next

सध्या स्मार्टफोनवर आपली अनेक कामं अवलंबून असतात. परंतु जर हा डिवाइस हरवला तर काय करायचं? आज आम्ही तुमच्यासाठी अशा ट्रिक्स घेऊन आलो आहोत ज्यात तुमची मदत करतील. आणि तुमचा हरवलेला स्मार्टफोन शोधण्यास मदत करतील. विशेष म्हणजे काही स्मार्टफोन स्विच ऑफ झाल्यावर देखील ट्रॅक करता येतात.  

फोन हरवल्यावर काही मिनिटांत  

तुमचा फोन हरवला असेल किंवा चोरीला गेला असेल तर तुम्ही सर्वप्रथम तुमच्या फोन नंबरवर कॉल करून पाहू शकता. जर फोन तुमच्या आजूबाजूला असेल तर रिंगचा आवाज येईल. कुणाला सापडला असल्यास अशी व्यक्ती तो कॉल उचलून तुम्हाला मदत देखील करू शकते. आत्ताच तुमच्या स्मार्टफोनला पासवर्डची सुरक्षा लावून घ्यावी म्हणजे फोन हरवल्यास कोणालाही गैरफायदा घेता येणार नाही.  

असा करा iPhone ट्रॅक 

iPhone युजर फोन हरवल्यावर दुसऱ्याच्या डिवाइसवर आपल्या अ‍ॅप्पल आयडीनं लॉग-इन करून ‘लॉस्ट मोड’ अ‍ॅक्टिव्हेट करू शकतात. तसेच अ‍ॅप्पलच्या ‘फाईंड माय आयफोन’ चा देखील वापर करू शकता. ‘फाईंड माय नेटवर्क’ च्या मदतीने स्विच ऑफ असलेला फोन देखील 24 तासांनंतर ट्रॅक करू शकता. दुसरा अ‍ॅप्पल डिवाइस जवळ नसेल तर iCloud.com वर देखील हे फीचर्स उपलब्ध आहेत.  

असा करा अँड्रॉइड स्मार्टफोन ट्रॅक 

अँड्रॉइडच्या डिवाइस मॅनेजरमध्ये ‘फाईंड माय डिवाइस’ फीचर आहे. परंतु या फिचरसाठी हरवलेल्या स्मार्टफोनमध्ये जीपीएस फीचर ऑन असणं आवश्यक आहे. तुम्ही https://www.google.com/android/find वर जाऊन देखील तुम्ही हरवलेला अँड्रॉइड ट्रॅक करू शकता. तसेच डेटा देखील डिलीट करू शकता.  

हे देखील वाचा:

EMI वर स्मार्टफोन घेण्याचा विचार करताय? त्याआधी हे वाचा, हजारोंची होईल बचत

स्मार्टफोनला कव्हर वापरताय? त्याचे तोटेही अनेक आहेत, समजल्यावर काढून टाकाल...

Web Title: How To Track Missing Or Stolen Smartphone With Even When Phone Is Switched Off Tricks For Both iOS And Android 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.