WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! चॅट हिस्ट्री आता झटपट करा ट्रान्सफर; QR कोड स्कॅन अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 12:07 PM2023-07-04T12:07:54+5:302023-07-04T12:14:31+5:30
WhatsApp ने आपल्या युजर्सना मोठा दिलासा दिला आहे. आतापर्यंत WhatsApp चॅट ट्रान्सफर करणं हे एक मोठं काम होतं.
WhatsApp ने आपल्या युजर्सना मोठा दिलासा दिला आहे. आतापर्यंत WhatsApp चॅट ट्रान्सफर करणं हे एक मोठं काम होतं. पण आता युजर्स फक्त QR स्कॅन करून WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करू शकतील. यासाठी WhatsApp युजर्सना क्लाउड बॅकअपची गरज नाही. युजर्स थेट Wi-Fi वर चॅट हिस्ट्री ट्रान्सफर करण्यास सक्षम असतील. त्यासाठी वाय-फाय डायरेक्टची मदत घेतली जाणार आहे.
वाय-फाय डायरेक्ट फीचर दोन डिव्हाईसमध्ये सहज चॅट ट्रान्सफर करण्याची सुविधा देते. यासाठी दोन डिव्हाईस वाय-फायशी जोडावी लागतील. दोन्ही डिव्हाईस एकमेकांच्या जवळ ठेवावी लागतात. मग ते वाय-फायशी कनेक्ट करावे लागेल. यासोबतच लोकेशनही चालू करावे लागेल. यानंतर, ज्या स्मार्टफोनमधून WhatsApp चॅट ट्रान्सफर करायचे आहे तो स्मार्टफोन चालू करा. फोनचं लॉक ओपन करा.
फोनमधील सेटिंग्ज ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर WhatsApp चॅट ट्रान्सफर पर्यायावर क्लिक करा. यापुढे QR कोड दिसेल. नवीन फोनवरून WhatsApp चॅट हिस्ट्री स्कॅन करावी लागेल. नवीन फोनमध्ये WhatsAppडाउनलोड करावे लागेल. यानंतर फोन नंबर रजिस्टर्ड करावा लागणार आहे.
क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर दुसरा फोन वाय-फाय डायरेक्टशी कनेक्ट करावा लागेल. WhatsApp चॅट ट्रान्सफर करण्याची रिक्वेस्ट स्वीकारावी लागेल. त्यानंतर चॅट नवीन फोनवर ट्रान्सफर होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. WhatsApp देखील आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं.