Instagram रिल्समुळे डेटा संपतोय? ही सोप्पी ट्रिक वाचवेल निम्मा डेटा
By सिद्धेश जाधव | Published: February 16, 2022 08:16 PM2022-02-16T20:16:34+5:302022-02-16T20:17:00+5:30
Instagram च्या ऑटोप्ले व्हिडीओ फीचरमुळे डेटा वाया जातो. हे फिचर बंद करता येतं, चला जाणून घेऊया प्रोसेस.
Instagram मध्ये युजर्सना अनेक शानदार फीचर्स मिळतात. यातील रिल्स व्हिडीओमुळे लोक अनेक तास या अॅप वर असतात. एक व्हिडीओ बघितल्यावर पुढील व्हिडीओज आपोआप प्ले होतात. यात वेळ कसा जातो ते समजत नाही. यामुळे फक्त वेळ नव्हे तर मोबाईल डेटा देखील वाया जातो. या अॅपमध्ये हे ऑटोप्ले व्हिडीओ फीचर बंद करता येतं. चला जाणून घेऊया त्याची संपूर्ण प्रोसेस.
Instagram मध्ये ऑटोप्ले व्हिडीओ फीचर ऑफ करण्यासाठी
इन्स्टाग्राममध्ये यासाठी खास ऑप्शन देण्यात आलेला नाही. परंतु Instagram मधील डेटा सेव्हर फिचरचा वापर करून तोडगा काढता येतो. तुम्हाला फक्त Data Saver ऑन करायचं आहे. त्यामुळे इन्स्टाग्राम आधीच व्हिडीओ लोड करणार नाही. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
- सर्वप्रथम तुमच्या Android स्मार्टफोनमध्ये इन्स्टाग्राम ओपन करा.
- त्यानंतर प्रोफाईल पेजवर जा.
- तिथे वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यातील तीन लाईन्सवर क्लिक करा.
- आता सेटिंग मध्ये जा. त्यानंतर अकाऊंटमध्ये जाकर Cellular Data Use ची निवड करा.
- त्यानंतर Data Saver वर क्लिक करा.
हे देखील वाचा:
- फक्त 1999 रुपयांमध्ये बुक करा Samsung चा सर्वात शक्तिशाली फोन; Galaxy S22 Series ची भारतीय किंमत आणि लाँच डेट लीक
- 5G फोन घेताना फसू नका; त्यामध्ये किती बँड मिळतात ते पहा; ही पहा ‘खऱ्या’ 5G फोन्सची यादी