आपल्याला आपल्या स्मार्टफोनवर 5G सेवा वापरायची आहे? Airtel, Jio, Vi यूजर्स फॉलो करा या सोप्या स्टेप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 06:08 PM2022-10-02T18:08:31+5:302022-10-02T18:09:42+5:30
महत्वाचे म्हणजे, सध्या आपल्याकडे 5जी फोन असला तरीही, आपल्याला ही सेवा सहजपणे वापरता येणार नाही. ही सेवा वापरण्यासाठी आपल्याला काही स्टेप्स फॉलो करणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली - देशभरात 1 ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. एअरटेलने कालपासूनच देशातील 8 प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. यांत दिल्ली, मुंबई, वाराणसी, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, सिलीगुडी आणि कोलकाता यां प्रमुख शहरांचा समावेश आहे. इतर कंपन्याही आगामी काही दिवसांत 5G सेवा देण्याच्या तयारीत आहेत. महत्वाचे म्हणजे, 5G सेवेचा अनुभव घेण्यासाठी, काही युजर्स तर 5G फोनही खरेदी करत आहेत. तर काही युजर्सकडे आधीपासूनच 5G ला सपोर्ट करणारे डिव्हाइस आहेत.
महत्वाचे म्हणजे, सध्या आपल्याकडे 5जी फोन असला तरीही, आपल्याला ही सेवा सहजपणे वापरता येणार नाही. ही सेवा वापरण्यासाठी आपल्याला काही स्टेप्स फॉलो करणे आवश्यक आहे. Airtel, Jio आणि Vodafone Idea (Vi) युजर्सना त्यांच्या फोनमध्ये 5G चालवण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
1 - सर्वप्रथम, आपल्या भागात 5G सेवा सुरू झालेली आहे, की नाही हे ऑपरेटरकडून चेक करून घ्या. यासंदर्भात आपण Jio, Airtel अथवा Vi च्या कस्टमर केअर सोबत बोलू शकता.
2 - जर आपल्या भागात 5G असेल, तर आपला फोन Jio, Airtel अथवा Vi कडून दिल्या जात असलेल्या 5G बँडला सपोर्ट करतो की नाही? हे चेक करावे लागेल. यानंतर आता आपण 5G स्मार्टफोनच्या सेटिंग्समध्ये जा आणि मोबाइल नेटवर्क ऑप्शनवर क्लिक करा.
3 - यानंतर, आपल्याला ज्या ऑपरेटरची 5G कनेक्टिव्हिटी सुरू करायची आहे, त्या ऑपरेटरला सिलेक्ट करावे लागेल.
4 - सिम 1 अथवा सिम 2 पैकी कुण्या एकावर क्लिक करा आणि Preferred Network Type मिळविण्यासाठी स्क्रोल करा.
6 - आता 5G/4G/4G/2G (Auto) पैकी ऑप्शन सिलेक्ट करा. यानंतर, आपला स्मार्टफोन ऑटोमॅटिकली आपल्या एरियात सुरू असलेले 5G नेटवर्क सर्च करेल आणि त्याल आपल्या फोनवर डिफॉल्ट डेटा कनेक्टिव्हिटी पर्याय बनवेल
7 - याशिवाय ही सेवा वापरण्यासाठी आपल्याला आपल्या फोनवर सॉफ्टवेअरही अपडेट करावे लागू शकते. यासाठी 5G शी संबंधित एखाद्या फीचरसंदर्भात काही अपडेट आले आहे का, हे जाणून घेण्यासाठी सेटिंग्स चेक करा.
8 - आता आपला फोन रीस्टार्ट करा. जर आपल्या सर्कलमध्ये 5जी उपलब्ध असेल, तर अपोआप आपला फोन 5G ला कनेक्ट होईल.