इंटरनेटविना 4 फोन्सवर वापरता येणार WhatsApp, नवीन अपडेटमुळे मोठं झंझट संपणार

By सिद्धेश जाधव | Published: March 23, 2022 12:30 PM2022-03-23T12:30:15+5:302022-03-23T12:30:29+5:30

गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सअ‍ॅप मल्टी-डिवाइस फीचरची बीटा टेस्टिंग सुरु होती. आता कंपनीनं multi-device Feature चं स्टेबल व्हर्जन सादर करण्यास सुरुवात केली आहे.

How To Use WhatsApp On 4 Devices Using WhatsApp Multi Device Feature Stable Version   | इंटरनेटविना 4 फोन्सवर वापरता येणार WhatsApp, नवीन अपडेटमुळे मोठं झंझट संपणार

इंटरनेटविना 4 फोन्सवर वापरता येणार WhatsApp, नवीन अपडेटमुळे मोठं झंझट संपणार

googlenewsNext

WhatsApp जेव्हापासून लाँच झालं आहे तेव्हापासून कंपनीकडे युजर्स एका फिचरची मागणी करत होते. ते फिचर म्हणजे, एकच व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट अनेक डिवाइसेज वर वापरता यावं. यासाठी कंपनीनं वेब व्हॉट्सअ‍ॅपचा पर्याय दिला होता परंतु मेन डिवाइसवर इंटरनेटची गरज असल्यामुळे त्या फिचरचे देखील काही तोटे होतेच. गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सअ‍ॅप मल्टी-डिवाइस फीचरची बीटा टेस्टिंग सुरु होती. आता कंपनीनं multi-device Feature चं स्टेबल व्हर्जन सादर करण्यास सुरुवात केली आहे.  

या नवीन फीचरच्या मदतीनं पाच डिवाइसेज एकाच अकॉऊंटशी कनेक्ट करता येतील. या फिचरला ‘व्हॉट्सअ‍ॅप लिंक्ड डिवाइस’ असं नाव देण्यात आलं आहे. हे व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्समध्ये दिसण्यास सुरुवात झाली आहे. या फीचरच्या माध्यमातून आता जरी तुमचा प्रायमरी फोनमा इंटरनेटशी कनेक्टड नसेल, तरी अन्य डिवाइसेजवर तेच व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट वापरता येईल. परंतु 14 दिवसांपेक्षा जास्त प्रायमरी डिवाइस बंद ठेवता येणार नाही.  

प्रायमरी डिवाइससह एक व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट अन्य 4 डिवाइसेस जोडता येतील. ज्यात स्मार्टफोन, लॅपटॉप, डेस्कटॉप आणि टॅबलेट इत्यादींचा समावेश आहे. चला जाणून घेऊया हे फीचर कसं इनेबल करायचं:   

  • सर्वप्रथम लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर Whatsapp Web ओपन करा. 
  • त्यानंतर तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्समध्ये Linked Devices ऑप्शनची निवड करा.  
  • ‘LINK A DEVICE’ वर क्लीक करून लॅपटॉप स्क्रीनवरील QR कोड स्कॅन करा.  
  • नवीन डिवाइस कनेक्ट झाल्यावर तुम्ही स्मार्टफोनवरील व्हॉट्सअ‍ॅपचं नेट बंद करू शकता.  

Web Title: How To Use WhatsApp On 4 Devices Using WhatsApp Multi Device Feature Stable Version  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.