चुकीच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे जातील अशी भीती वाटते? पैसे न पाठवता व्हेरिफाय करा नाव, वाचवा पैसे  

By सिद्धेश जाधव | Published: June 13, 2022 03:01 PM2022-06-13T15:01:46+5:302022-06-13T15:02:36+5:30

अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करताना एक छोटीशी चूक भारी पडू शकते, त्यामुळे अकाऊंट व्हेरिफाय केल्यानं अशी चूक टाळता येईल.  

How to verify bank account number before sending money using bhim app  | चुकीच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे जातील अशी भीती वाटते? पैसे न पाठवता व्हेरिफाय करा नाव, वाचवा पैसे  

चुकीच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे जातील अशी भीती वाटते? पैसे न पाठवता व्हेरिफाय करा नाव, वाचवा पैसे  

Next

पैशाचे डिजिटल व्यवहार करताना अनेकांना भीती वाटते. एखादा आकडा अंक चुकल्यास पाठवलेले पैसे दुसऱ्या कुणाच्या तरी अकाऊंटमध्ये जाऊ शकतात. विशेष म्हणजे एकदा असे पैसे गेले की पुन्हा मिळवणं देखील कठीण होतं. अशावेळी अनेकजण 1 रुपया सारखी छोटी अमाऊंट पाठवून अकाऊंट व्हेरिफाय करतात. परंतु हे काम तुम्ही अगदी मोफत करू शकता.  

इथे आम्ही तुम्हाला अशी एक पद्धत सांगणार आहोत जी तुम्ही पैसे पाठवत असलेलं अकाऊंट सहज व्हेरिफाय करू शकते. तुम्ही टाकलेल्या अकाऊंट नंबर आणि आयएफएससी कोडवरून अकॉऊंट होल्डरचं नाव मिळेल. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला 1 रुपया किंवा 5 रुपया अशी छोटी अमाऊंट देखील खर्च करण्याची गरज नाही.  

भीम अ‍ॅप करेल मदत 

सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये UPI बेस्ड अ‍ॅप BHIM डाउनलोड करून घ्या. हे अ‍ॅप अन्य युपीआय अ‍ॅप्स प्रमाणे सेटअप करून घ्या. यात बँक अकाऊंट अ‍ॅड करून घ्या. इथे तुम्हाला बँक अकाऊंट, UPI ID किंवा फोन नंबरवर पैसे ट्रान्सफर करण्याचा पर्याय मिळेल. तसेच इथे युजर्सना अकाऊंट होल्डरची माहिती मिळवण्याची देखील सुविधा मिळते. जेणेकरून तुम्ही चेक करू शकता की अकाऊंट वैध आहे की नाही.  

असं करा पैसे पाठवण्याआधी अकाऊंट व्हेरिफाय:  

  • बँक अकाऊंट नंबर व्हेरिफाय करण्यासाठी BHIM अ‍ॅप इन्स्टॉल करून सेटअप करा.  
  • त्यानंतर अ‍ॅप होम स्क्रीनवरील सेंड आयकॉनवर क्लिक करा.  
  • इथे तुम्हाला A/C+IFSC चा ऑप्शन मिळेल. ज्या अकाऊंटवर पैसे पाठवायचे त्याची बँक निवडा.  
  • बँक निवडल्यावर ब्रँचचा IFSC कोड टाका. त्यानंतर बेनिफिशियरी अकाऊंट नेमची जागा रिकामी ठेऊन दोनदा अकाऊंट नंबर टाकून कन्फर्म करा. 
  • दोन्ही वेळा योग्य अकाऊंट नंबर टाकल्यास ग्रीन टिक बॉक्स दिसेल. खाली असलेल्या व्हेरिफाय बटनवर क्लिक केल्यावर स्क्रीनवर अकाऊंट होल्डरचं नाव येईल.  
  • बऱ्याचदा प्रायव्हसीच्या कारणांमुळे पूर्ण नाव दाखवलं जात नाही. अशावेळी तुम्ही पाहिलं नाव टाकून आडनाव कन्फर्म करून घेऊ शकता.  
  • आता अकाऊंट व्हेरिफाय झाल्यावर तुम्ही बिन्दास्त BHIM किंवा इतर कोणत्याही अ‍ॅपमधून ट्रांजॅक्शन करू शकता.  

Web Title: How to verify bank account number before sending money using bhim app 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.