चॅटिंगची मजा घालवणारे Android मधील ऑटोकरेक्ट फीचर असे करा ऑफ, जाणून घ्या सोप्पी पद्धत 

By सिद्धेश जाधव | Published: October 30, 2021 05:07 PM2021-10-30T17:07:17+5:302021-10-30T17:07:43+5:30

How To Off Auto Correct: Android फोनच्या कीबोर्डमध्ये ऑटोकरेक्ट फीचर दिला जातो. या फीचरचे काम आपल्या चुकलेल्या स्पेलिंग्स ठीक करणे असते. परंतु ही लूडबूडच कधी कधी चॅटिंगची मजा घालवते.  

How to turn off autocorrect feature in android smartphone  | चॅटिंगची मजा घालवणारे Android मधील ऑटोकरेक्ट फीचर असे करा ऑफ, जाणून घ्या सोप्पी पद्धत 

चॅटिंगची मजा घालवणारे Android मधील ऑटोकरेक्ट फीचर असे करा ऑफ, जाणून घ्या सोप्पी पद्धत 

googlenewsNext

How to Remove Autocorrect: Android डिवाइसेजमधील कीबोर्डमध्ये ऑटोकरेक्ट फीचर मिळते. हे फिचर युजरच्या चुकलेल्या स्पेलिंग ठीक करण्याचे असते. जर युजरने चुकीचा इंग्रजी शब्द टाईप केला कि तो आपोआप दुरुस्त केला जातो म्हणजे ऑटोकरेक्ट होतो. हे फीचर इंग्रजीतून संवाद साधताना खूप कामी येते. तसेच ज्यांचं इंग्रजीवर प्रभुत्व नाही त्यांना देखील याचा फायदा होतो.  

परंतु, अनेकदा हे फिचर याच लोकांची समस्या वाढवतो. युजरला लिहायचे एक असते आणि ऑटोकरेक्टर फीचरमुळे वेगळेच काही तरी टाईप होऊन जाते. तसेच रोमन लिपीतून मराठी लिहिताना देखील या फिचरमुळे बरेच शब्द आपोआप बदलले जातात. त्यामुळे हे फीचर बंद करणे भाग पडते. जर तुम्ही बेसिक Android Gboard (Google Keyboard) का वापरत असाल आणि तुम्हाला ऑटोकरेक्ट फीचर ऑफ करायचे असेल तर पुढे आम्ही याची पद्धत सांगितली आहे.  

Android Phone मध्ये ऑटोकरेक्ट फीचर ऑफ करण्यासाठी: 

  • सर्वप्रथम तुमच्या Android डिवाइसच्या सेटिंगमध्ये जा. 
  • त्यानंतर Language and Input ऑप्शनवर क्लिक करा. हा ऑप्शन System किंवा General Management मध्ये मिळेल. 
  • त्यानंतर Virtual कीबोर्डचा ऑप्शन सिलेक्ट करा. 
  • आता तुम्हाला तुमच्या फोनमधील सर्व कीबोर्ड दिसतील. त्यात Google Keyboard वर क्लिक करा. 
  • त्यानंतर कीबोर्डची बेसिक सेटिंग ओपन होईल.  
  • इथे तुम्हाला Text Correction ऑप्शन मिळेल. 
  • त्यावर क्लिक करून Auto Correction टॉगल ऑफ करा. 

जर तुम्ही इतर कोणतेही कीबोर्ड अ‍ॅप वापरत असाल तर, ऑटोकरेक्ट फीचर ऑफ करण्यासाठी स्टेप्स थोड्या वेगळ्या असू शकतात.  

Web Title: How to turn off autocorrect feature in android smartphone 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.