तुमच्या जुन्या स्मार्टफोनला अशाप्रकारे बनवा सिक्युरिटी कॅमेरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:19 PM2018-06-08T13:19:43+5:302018-06-08T13:19:43+5:30
तुमच्याकडे जर एखादा जुना वापरात नसलेला फोन असेल तर तुम्ही त्याचा वापर घराच्या सुरक्षेसाठीही करु शकता.
मुंबई : आजच्या जगात अपटेडेट टेक्नॉलॉजीमुळे सगळंकाही शक्य आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा वापर केवळ कॉलिंगसाठी नाहीतर कॅमेरा स्कॅनिंगसारख्या आणखीही अनेक कामांसाठी करु शकता. इतकेच काय तर तुमच्याकडे जर एखादा जुना वापरात नसलेला फोन असेल तर तुम्ही त्याचा वापर घराच्या सुरक्षेसाठीही करु शकता.
एका स्मार्टफोनच्या माध्यमातून जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून तुम्ही घर आणि ऑफिसवर लक्ष ठेवू शकता. आम्ही अशाच एका अॅपबाबत तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही स्मार्टफोनचा वापर सिक्युरिटी कॅमेरासारखा करु शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये IP Webcam हे अॅप डाऊनलोड करावं लागेल.
IP Webcam अॅप कसं करेल काम ?
1) IP Webcam अॅप आधी गुगल प्ले स्टोरवरुन डाऊनलोड करा. अॅप ओपन करण्याआधी फोनच्या सेटिंगमध्ये जा. त्यात तुम्हाला सगळे अॅप दिसतील. त्यानंतर तुमच्या फोनमध्ये जितकेही कॅमेरा अॅप आहेत ते फोर्स स्टॉप करा. नंतर IP Webcam अॅप ओपन करा.
2) ते ओपन केल्यावर प्लग-इनचा पर्याय सेलेक्ट करुन त्यावर टॅप करा. त्यात देण्यात आलेले सगळे फिचर्स इन्स्टॉल करा. फिचर्स इन्स्टॉल केल्यानंतर सर्वच फिचर्स ऑन करा. यातील एकही फिचर ऑफ राहिल्यास हे अॅप काम करणार नाही.
3) आता अॅपमध्ये जाऊन खाली देण्यात आलेल्या start server पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर ओपन होणाऱ्या विंडोला yes करा.
4) विंडोमध्ये Webcam चा IP अॅड्रेस येईल. तो कॉपी करुन त्या फोन किंवा PC मध्ये टाका ज्यावर लाईव्ह व्हिडीओ बघायचा आहे.
5) त्या ब्राऊजरवर IP अॅड्रेस टाकून एंटर करा. त्यानंतर एक विंडो ओपन होईल. त्या ब्राऊजरवर टॅप करा तुम्हाला लाईव्ह व्हिडीओ दिसायला लागेल.