अँड्रॉइड स्मार्टफोनचा Password विसरलात? अशाप्रकारे करा काही सेकंदात स्मार्टफोन अनलॉक 

By सिद्धेश जाधव | Published: July 14, 2021 07:46 PM2021-07-14T19:46:20+5:302021-07-14T19:47:21+5:30

सुरक्षेसाठी हे आवश्यक असले तरी अनेकदा पासवर्ड वापरूनही आपण पासवर्ड विसरतो. वारंवार प्रयत्न करून देखील स्मार्टफो अनलॉक होत नाही. आम्ही सांगितलेली पद्धत वापरून तुम्ही घर बसल्या तुमचा स्मार्टफोन पुन्हा वापरू शकाल.  

How to unlock your phone when you forgot the password  | अँड्रॉइड स्मार्टफोनचा Password विसरलात? अशाप्रकारे करा काही सेकंदात स्मार्टफोन अनलॉक 

या कामासाठी मोबाईल शॉप व सर्विस सेंटरवाले तुमच्याकडून पैसे घेतात.

Next

सध्या स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आपण स्मार्टफोनमध्ये बरीच माहिती, फोटो, व्हिडीओ आणि चॅटिंग अशी भावनिकदृष्ट्या मौल्यवान माहिती साठवून ठेवतो. ही माहिती सुरक्षित राहावी म्हणून फोन पासवर्ड किंवा पॅटर्नने लॉक केला जातो. सुरक्षेसाठी हे आवश्यक असले तरी अनेकदा पासवर्ड वापरूनही आपण पासवर्ड विसरतो. वारंवार प्रयत्न करून देखील स्मार्टफो अनलॉक होत नाही. परंतु तुम्हाला माहित आहे का कोणताही फोन पॅटर्न आणि पासवर्डने लॉक झाल्यानंतर देखील स्मार्टफोन अनलॉक केला जाऊ शकतो. यासाठी काही ट्रिक्सची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

बऱ्याचदा अश्यावेळी युजर्स मोबाईलच्य दुकानावर किंवा रिपेयर शॉपमध्ये जातात. या कामासाठी मोबाईल शॉप व सर्विस सेंटरवाले तुमच्याकडून पैसे घेतात. परंतु आम्ही सांगितलेली पद्धत वापरून तुम्ही घर बसल्या तुमचा स्मार्टफोन पुन्हा वापरू शकाल.  

Google Device Manager ची मदत घ्या 

गुगल डिवाइस मॅनेजरमधून फोन ऑनलॉक करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये इंटरनेट सुरु असणे, गुगल अकॉउंट लॉगिन असणे आणि GPS ऑन असणे आवश्यक आहे.  

  • त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या फोन किंवा कंप्यूटरवरून google.com/android/devicemanager वर जावे लागेल. 
  • तिथे तुमच्या Google अकॉउंटमध्ये साइन इन करा. 
  • जो फोन अनलॉक करायचा आहे तो निवडा.  
  • ‘लॉक’ असा ऑप्शन निवडा आणि नवीन पासवर्ड टाइप करा. 
  • आता तुमच्या फोनच्या स्क्रीनवर पासवर्ड विचारला जाईल. नवीन पासवर्ड जो तुम्ही डिवाइस मॅनेजरवर सेट केला असेल तो टाकल्यावर फोन अनलॉक होईल. 

Factory Resetting देखील एक पर्याय आहे  

वर दिलेल्या अटी लागू होत नसतील तर तुम्ही फोन फॅक्टरी रिसेट करू शकता. फोन फॅक्टरी रिसेट केल्यावर तुमचा सर्व खाजगी डेटा डिलीट होईल, याची नोंद घ्यावी. अँड्रॉइड स्मार्टफोन फॅक्टरी रिसेट करण्यासाठी: 

  • सर्वप्रथम तुमचा फोन स्विच ऑफ करा. 
  • एक मिनिटानंतर पावर बटण आणि वॉल्यूम डाउन बटण एकसाथ दाबून ठेवा. 
  • आता तुम्ही फोन रिकवरी मोडमध्ये जाल. तिथे factory reset ऑप्शन निवडण्यासाठी वॉल्यूम बटणचा वापर करा. 
  • फोन पूर्णपणे क्लीन करण्यासाठी Wipe Cache चा ऑप्शन सिलेक्ट करा. 
  • एक मिनिट वाट बघा आणि तुमचा फोन ऑन करा. 
  • आता तुमच्याकडे अगदी नवा कोरा स्मार्टफोन असेल जो तुम्ही पासवर्ड न टाकता वापरू शकता.  

Web Title: How to unlock your phone when you forgot the password 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.