एका स्मार्टफोनवर अशाप्रकारे वापरा दोन व्हॉट्सअॅप अकॉउंट; जाणून घ्या पद्धत
By सिद्धेश जाधव | Published: November 4, 2021 08:19 PM2021-11-04T20:19:40+5:302021-11-04T20:20:04+5:30
How to Use two WhatsApp Account in One Smartphone: जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये एकसाथ 2 WhatsApp अकॉउंट वापरायचे असतील तर पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
How to Use two WhatsApp Account in One Smartphone: व्हॉट्सअॅप भारतातील लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. दिवसेंदिवस या अॅपमधील फिचर वाढत आहेत. आता व्हॉट्सअॅपवर यूपीआय पेमेंटचा पर्याय उपलब्ध झाला आहे. हे फिचर वापरण्यासाठी व्हॉट्सअॅप आणि बँकेकडे दिलेला नंबर एक असणे गरजेचे असते. या नियमामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वच युजर्स एकच नंबर सगळीकडे एकच नंबर वापरत नाहीत. त्यामुळे एकाच फोनमध्ये 2 WhatsApp अकॉउंट वापरावे लागतात, एक मेसेजिंगसाठी तर दुसरं पेमेंटसाठी. 2 व्हॉट्सअॅप नंबर वापरणे सोप्पे आहे.
यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अॅप देखील इन्स्टॉल करण्याची गरज नाही. या प्रश्नाचे उत्तर स्मार्टफोन कंपन्यांनी दिले आहे. युजर्सना Android फोनवर एकाच अॅपचे दोन वेगवेगळे व्हर्जन बाळगता येतात. यासाठी तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
How to Use two WhatsApp Account on One Smartphone
- सर्वप्रथम फोनच्या सेटिंगमध्ये जा.
- तिथे तुमच्या मोबाईल कंपनीनुसार Dual/Parallel/App Clone या नावाचे फीचर मिळेल.
- त्यावर क्लिक करा, म्हणजे अनेक अॅप्स दिसतील.
- त्यातील WhatsApp समोरील टॉगलवर क्लिक करा.
- प्रोसेस पूर्ण होऊ द्या. आता तुमच्या होम स्क्रीनवर नवीन WhatsApp आयकॉन एका छोट्या मार्कसह दिसेल.
- नवीन व्हॉट्सअॅप ओपन करून सेटअप करून घ्या.
अशाप्रकारे एकाच फोनमध्ये 2 WhatsApp अकॉउंट वापरता येतील. यासाठी Xiaomi फोन्समध्ये Dual apps ऑप्शन आहे. तर Samsung फोन्समध्ये Settings मध्ये Advance features मध्ये जाऊन Dual Messenger, OnePlus Settings मध्ये Utilities मध्ये Parallel Apps, Realme फोन्सच्या App management मध्ये App cloner, Oppo च्या Settings मध्ये App Cloner आणि Vivo च्या Settings मध्ये Apps and notifications मध्ये App Clone नावाचे फीचर आहे.