कसा असेल फ्युचर स्मार्टफोन? होलोग्राफिक डिस्प्ले की इलेक्ट्रॉनिक टॅटू, कोणतं तंत्रज्ञान वापरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 09:49 PM2022-09-17T21:49:56+5:302022-09-17T21:50:29+5:30
Future Smartphone Concept: तुम्ही Iron Man आणि Star Wars सारखे चित्रपट पाहिले आहेत का? यामध्ये तुम्ही होलोग्राफिक डिस्प्लेची संकल्पना पाहिली असेल. भविष्यातही असेच तंत्रज्ञान आपल्याला पाहायला मिळू शकते.
Future Smartphone Concept: जर तुम्ही स्मार्टफोनचा इतिहास पाहिला तर तुम्हाला फार जुना डेटा सापडणार नाही. अवघ्या दोन दशकांच्या प्रवासात हे तंत्रज्ञान ज्या वेगाने विकसित झाले आहे. त्याचे भविष्य कसे असेल याची नुसती कल्पना करून पाहा. पूर्ण टच स्क्रीन, नंतर पंच होल, अंडर डिस्प्ले कॅमेरा आणि स्पीकर, फोल्डिंग स्मार्टफोनच्या पुढे आता नवं काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही.
टेक्नॉलॉजी एक्सपर्ट्स विविध प्रकारच्या शक्यता वर्तवत असतात. यावरून आपल्या भविष्यातील फोनची संकल्पना दिसून येईल. स्मार्टफोन उत्पादक विविध प्रकारचे पेटंट फाईल करत राहतात. पोर्ट आणि बटणे नसलेल्या फोनची संकल्पना आपण आधीच पाहिली आहे. याशिवाय डिस्प्ले, प्रोसेसर, एआय आणि इतर तंत्रज्ञानावरही कंपन्या खूप काम करत आहेत. यामध्ये आपल्याला भविष्यातील फोन्सची झलक पाहायला मिळते. भविष्यात आपल्याला कसे स्मार्टफोन्स पाहता येतील हे पाहूया.
होलोग्राफिक डिस्प्ले
होलोग्राफिक डिस्प्ले, एकेकाळी सायफाय चित्रपटांचा भाग होता. पण भविष्यात व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी ते नवीन माध्यम असू शकेल. स्टार वॉर्स, ब्लेड रनर 2049, आय, रोबोट आणि आयर्न मॅन सारख्या चित्रपटांमध्ये तुम्ही हे फीचर पाहिले असेल. 2030 पर्यंत स्मार्टफोनमध्ये होलोग्राफिक डिस्प्लेची सुविधा उपलब्ध होऊ शकते. या फीचरच्या मदतीने थ्रीडी इमेजेस किंवा व्हिडीओज रेंडर करता येतात. यासाठी तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त गॅझेटची गरज भासणार नाही.
नाबटण ना पोर्ट
तंत्रज्ञान ज्या प्रकारे विकसित होत आहे त्यानुसार भविष्यातील फोनमध्ये कोणतेही पोर्ट मिळणार नाही असे वाटते. अंडर डिस्प्ले कॅमेरा, अंडर डिस्प्ले स्पीकर आणि वायरलेस चार्जिंग आपण पाहिले आहे. असाच एक फोन आधीच बाजारात आला आहे. Vivo 2019 Apex हा असाच एक कॉन्सेप्ट फोन होता. नवीन आयफोन (iPhone 14 US मॉडेल) मध्ये प्रत्यक्ष सिमकार्डचा पर्यायही नाही. eSIM चा वापर आता हळूहळू सामान्य झाला आहे. अशा परिस्थितीत आपल्याला भविष्यातील फोनमध्ये कोणत्याही पोर्टची गरज भासणार नाही.
बिल गेट्स यांची भविष्यवाणी
वर्षाच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टचे को फाऊंडर बिल गेट्स यांनी स्मार्टफोन्सच्या तंत्रज्ञानाविषयी अंदाज वर्तवला होता. यामुळे स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे बदलेल. त्यांचा असा विश्वास होता की इलेक्ट्रॉनिक टॅटू स्मार्टफोनची जागा घेऊ शकतात. म्हणजेच भविष्यात स्मार्टफोनऐवजी इलेक्ट्रॉनिक टॅटूचा वापर केला जाऊ शकतो. बिल गेट्स यांच्या म्हणण्यानुसार, भविष्यात स्मार्टफोनला खिशात घेऊन फिरण्याची गरज भासणार नाही, तर स्मार्टफोन आपल्या शरीरात इंटिग्रेट केला जाईल. म्हणजेच, स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक टॅटूमध्ये बदलेल. हे इलेक्ट्रॉनिक टॅटू केवळ लहान आकाराचे चिप असतील आणि ते मानवी शरीरात बसवले जातील.
नोकियानंहीकेलीहोतीभविष्यवाणी
नोकियाचे सीईओ पेक्का लुंडमार्क यांनीही भविष्यातील स्मार्टफोनवर आपले मत मांडले होते. 2030 पर्यंत, स्मार्टफोनच्या सामान्य इंटरफेसमध्ये मोठा बदल दिसून येईल असे त्यांचे म्हणणे होते. या वेळेपर्यंत 6G तंत्रज्ञान आलेले असेल आणि स्मार्टफोनऐवजी स्मार्ट चष्मा किंवा अन्य डिव्हाईसचा वापर केला जाईल. 2030 पर्यंत स्मार्टफोनशी संबंधित अनेक गोष्टी थेट शरीरात इंटिग्रेट केल्या जाऊ लागतील, असेही पेक्का यांचे म्हणणे आहे.