फोनवर येणाऱ्या नोटिफिकेशनपासून अशी करा सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 04:48 PM2019-09-06T16:48:46+5:302019-09-06T17:01:59+5:30
गुगल प्ले स्टोरवरून युजर्स अनेक अॅप इन्स्टॉल करत असतात. मात्र यामध्ये येणारे नोटिफिकेशन्स हे अनेकदा त्रासदायक ठरतात.
नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. कॉलिंग, टेक्सिंग यासोबतच नोट्स सेव्ह करण्यासारखी अनेक कामं युजर्स करत असतात. गुगल प्ले स्टोरवरून युजर्स अनेक अॅप इन्स्टॉल करत असतात. मात्र यामध्ये येणारे नोटिफिकेशन्स हे अनेकदा त्रासदायक ठरतात. अनेकांना नोटिफिकेशन मॅनेज करता येतं हे माहीत नाही. नोटिफिकेशन चॅनलवर व्हॉट्सअॅप नोटिफिकेशन शिवाय नोटिफिकेशन टोन आणि कस्टम टाईम बदलता येतं.
सेटिंग्समध्ये हा पर्याय मिळेल
नोटिफिकेशन फीचर अँड्रॉईड 8 ओरीयो आणि यानंतर येणाऱ्या ओएसमध्ये आहे. युजर्स सर्व अॅप्ससाठी एकाच जागी नोटिफिकेशन मॅनेज करता येतात. यासाठी सर्वप्रथम अँड्रॉईड स्मार्टफोन अॅप ड्रॉर ओपन करा आणि अॅप सेटिंग्समध्ये जा. तिथे नोटिफिकेशनचा एक पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून नोटिफिकेशन चॅनल्स क्रिएट अथवा मॅनेज करता येतं.
नोटिफिकेशन सेटिंग्समध्ये फेलियर नोटिफिकेशन, मेसेज नोटिफिकेशन, क्रिटिकल अॅप अलर्ट्स, मीडिया प्लेबॅक, ग्रुप नोटिफिकेशन आणि अदर्स सारखे पर्याय दिसतील. युजर्सना जे नोटिफिकेशन एडिट करायचं आहे त्यावर टॅप करा. त्यानंतर गरजेनुसार त्यामध्ये युजर्स बदल करू शकतात. हाइड अॅप बारमधून देखील असं करता येतं. वेगवेगळ्या ऑडिओ टोन्स सेट करण्यासाठी साऊंडवर टॅप करा. याच पॅनच्या मदतीने लॉक स्क्रीन नोटिफिकेशन इनेबल करता येतं.
फोन खूप स्लो चार्ज होतो? 'ही' आहेत कारणं
फोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळेच बॅटरी लवकर लो होते. फोन चार्ज करण्यासाठी चार्जरचा वापर हा प्रामुख्याने केला जातो. मात्र कधी कधी फोन स्लो चार्ज होतो. त्यामागे अनेक कारण असतात. ही कारणं जाणून घेऊया.
चार्जर बदला - चार्जर खराब असल्यामुळे फोन अनेकदा चार्ज होत नाही. अशा वेळी फोनसोबत येणारी केबल आणि अॅडप्टरच्या मदतीने फोन चार्ज करण्याचा सल्ला दिला जातो. ओरिजनल चार्जरची खरेदी करा.
वीक पॉवर सोर्स - स्लो चार्जिंगसाठी नेहमी चार्जर जबाबदार असतो असं नाही. अनेकदा पॉवर सोर्स वीक असल्याने फोन स्लो चार्ज होतो.
खराब बॅटरी - फोनची बॅटरी खराब झाल्यामुळे काही वेळा फोन स्लो चार्ज होतो.
डॅमेज यूएसबी पोर्ट - यूएसबी पोर्ट डॅमेज झालं असल्यास फोन स्लो चार्ज होतो. अशावेळी ते बदला.
बॅकग्राऊंड अॅप - फोन स्लो चार्ज होण्यासाठी काही वेळा बॅकग्राऊंड अॅप देखील जबाबदार असतात. फोनमध्ये एखादं नवीन अॅप डाऊनलोड केल्यानंतर फोन स्लो झाला असेल तर ते अॅप लगेच अनइन्स्टॉल करा.