Whatsapp वर प्रोफाईल दिसणार बेस्ट; असं करा मॅनेज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 10:52 AM2019-09-16T10:52:19+5:302019-09-16T10:59:49+5:30

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठया प्रमाणात केला जातो.

this is how you can manage your whatsapp profile to make it look best | Whatsapp वर प्रोफाईल दिसणार बेस्ट; असं करा मॅनेज

Whatsapp वर प्रोफाईल दिसणार बेस्ट; असं करा मॅनेज

Next

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठया प्रमाणात केला जातो. मात्र व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना प्रोफाईल मॅनेज करण्याचा पर्याय देतं हे काही लोकांना माहीत नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्रामप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रोफाईल नसून ते थोडे वेगळे असते. व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाईलमध्ये युजर्सना फोटो, नाव, About आणि स्टेटस हे पर्याय मिळतात. याचा वापर करून युजर्स आपलं प्रोफाईल इतरांपेक्षा बेस्ट ठेवू शकतात. कसं ते जाणून घेऊया.

प्रोफाईल फोटो 

सर्वप्रथम  व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. टॉपमध्ये उजव्या बाजूला तीन डॉट्सवर टॅप करून मेन्यू ओपन करा. त्यानंतर सेटिंगमधील प्रोफाईल फोटो आयकॉनवर टॅप करा. कॅमेरा आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करून युजर्स फोटो क्लिक करू शकतात किंवा फोटोगॅलरीमधून त्यांना हवा असलेला त्यांच्या आवडीचा फोटो सिलेक्ट करू शकतात. तसेच प्रोफाईल फोटो रिमूव्ह देखील करता येतो. 

नाव 

व्हॉट्सअ‍ॅप ओपन करून तीन डॉटवर क्लिक करून मेन्यू ओपन करा. त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन प्रोफाईल फोटो आयकॉनवर क्लिक करा. त्यासमोर असलेल्या पेन्सिल आयकॉनवर क्लिक करा. तेथे नाव एडिट करता येतं युजर्स त्यांना हवं असलेलं नाव टाईप करू शकतात. तसेच ज्या लोकांकडे युजर्सचा फोन नंबर सेव्ह नाही त्यांना युजर्सने दिलेलं हे नाव दिसणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप नावामध्ये युजर्स इमोजीसह जास्तीत जास्त 24 कॅरेक्टरचा वापर करू शकतात.

About

व्हॉट्सअ‍ॅप सेटिंगमधील प्रोफाईल फोटो आयकॉनवर टॅप केल्यानंतर सर्वात खाली About चा पर्याय दिसेल. त्या बाजूला असलेल्या पेन्सिल आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतक एक लिस्ट दिसेल. त्यामध्ये available, busy, at work, in a meeting, urgent calls only हे पर्याय देण्यात आलेले आहेत. युजर्स त्यातील एक पर्याय निवड़ू शकतात किंवा 135 कॅरक्टर्समध्ये त्यांना हव्या असलेल्या गोष्टी देखील लिहू शकतात.

 स्टेटस 

व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या स्टेटसला विशेष महत्त्व आहे. अनेक जण आपल्या दैनंदिन आयुष्यातील गोष्टी स्टेटसच्या माध्यमातून शेअर करत असतात. युजर्सना स्टेटस ठेवायचे असल्यास व्हॉट्सअ‍ॅप ओपन करून स्टेटस स्क्रिनवर जा. स्टेटस आयकॉनवर टॅप केल्यानंतर कॅमेरा ओपन होईल. त्यावरून फोटो काढू शकता. तसेच व्हिडीओ रेकॉर्ड करून ते स्टेटसला ठेवू शकता. यासोबतच फोनमध्ये असलेले फोटो आणि व्हिडीओ ही स्टेटसला पोस्ट करू शकता. 24 तासांनंतर हे व्हॉट्सअ‍ॅपवरचं स्टेटस आपोआप डिलीट होतं. तसेच कोणी कोणी युजर्सचं स्टेटस पाहिलं याची देखील माहिती मिळेल. 

खूशखबर! Whatsapp वर लवकरच येणार 'ही' भन्नाट फीचर्स

Whatsappच्या 'या' नवीन फीचरमध्ये येणार फिंगरप्रिंट लॉक

व्हॉट्सअ‍ॅप कंपनी युजर्सला आकर्षित करण्यासाठी नेहमीच नवनवीन फीचर्स घेऊन येते. त्यातच आता व्हॉट्सअ‍ॅप बीटामध्ये  फिंगरप्रिंट लॉक हे फीचर्स वापरता येणार आहे. त्यामुळे हे नवीन फीचर्स सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरणार आहे. या संबंधीत माहिती WABetaInfoने ट्विट करत दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जन  2.19.221 मध्ये हे नवीन फिंगरप्रिंट लॅाकची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच हे व्हर्जन उपलब्ध झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप सेटिंगच्या प्रायव्हसीमध्ये जाऊन 'ऑथेंटिकेशन' चे नवीन ऑप्शन उपलब्ध होईल. यानंतर युजर्स आपले फिंगर प्रिंट रजिस्टर करू शकणार आहे.

 

Web Title: this is how you can manage your whatsapp profile to make it look best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.