माउसची गरज नाही! विद्यार्थ्यांसाठी आला HP चा ‘टच स्क्रीन’ लॅपटॉप; मिळेल 14 तास बॅटरी लाईफ
By सिद्धेश जाधव | Published: April 13, 2022 11:58 AM2022-04-13T11:58:18+5:302022-04-13T13:42:52+5:30
HP Chromebook x360 14a लॅपटॉप भारतात इंटेल प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे.
HP Chromebook x360 14a लॅपटॉपचा नवीन व्हर्जन भारतात आला आहे. याआधी AMD 3015Ce प्रोसेसरसह येणारा हा क्रोमबुक आता Intel Celeron प्रोसेसरसह भारतात लाँच करण्यात आला आहे. यात 4GB RAM, टच स्क्रीन, 14 तासांची बॅटरी लाईफ आणि 360 डिग्री फोल्डेबल डिजाइन मिळते. चला जाणून घेऊया याची किंमत स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.
HP Chromebook x360 14a (Intel) चे स्पेसिफिकेशन्स
एचपीच्या या नव्या क्रोमबुकमध्ये 14 इंचाचा एचडी रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळतो. ही एक टच स्क्रीन आहे, तसेच यात x360 कंवर्टिबल हींज देण्यात आलं आहे. त्यामुळे या क्रोमबुकचा वापर एक टॅबलेट म्हणून देखील करता येऊ शकतो. यात Intel Celeron N4120 ची प्रोसेसिंग पावर देण्यात आली आहे. सोबत 4GB RAM आणि 64GB eMMC स्टोरेज मिळते.
हा लॅपटॉप विद्यार्थ्यांचा विचार करून बनवण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. या लॅपटॉपमध्ये Chrome OS आहे त्यामुळे यात गुगल अॅप्स चालतात. तसेच कामं सोप्पी करण्यासाठी गुगल असिस्टंट देखील मिळतो. व्हिडीओ कॉलिंगसाठी या क्रोमबुकमध्ये HD कॅमेरा देण्यात आला आहे, जो 88 डिग्री लेन्सला सपोर्ट करतो. हा लॅपटॉप सिंगल चार्ज 14 तासांची बॅटरी लाइफ देतो, असा दावा कंपनीनं केला आहे.
HP Chromebook x360 14a (Intel) ची किंमत
HP Chromebook x360 14a (Intel) ची किंमत भारतात 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा लॅपटॉप Mineral Silver, Ceramic White आणि Forest Teal कलरमध्ये विकत. याची विक्री कंपनीच्या अधिकृत वेबसाईट, अॅमेझॉन आणि प्रमुख रिटेल स्टोर्सवरून हा लॅपटॉप 1 मेपासून विकत घेता येईल.