विद्यार्थ्यांसाठी HP ने बजेटमध्ये सादर केला टचस्क्रीन लॅपटॉप; जाणून HP Chromebook x360 14a ची वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: October 12, 2021 06:36 PM2021-10-12T18:36:38+5:302021-10-12T18:36:56+5:30

Budget Laptop For Students HP Chromebook x360 14a price: HP Chromebook x360 14a लॅपटॉपमध्ये AMD 3015Ce प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर जो AMD Radeon ग्राफिक्स आणि 4GB RAM देखील मिळतो.  

Hp chromebook x360 14a launched in india with amd processor touch screen price specifications features availability  | विद्यार्थ्यांसाठी HP ने बजेटमध्ये सादर केला टचस्क्रीन लॅपटॉप; जाणून HP Chromebook x360 14a ची वैशिष्ट्ये 

विद्यार्थ्यांसाठी HP ने बजेटमध्ये सादर केला टचस्क्रीन लॅपटॉप; जाणून HP Chromebook x360 14a ची वैशिष्ट्ये 

Next

HP ने भारतात HP Chromebook x360 14a नावाचा एक नवीन बजेट क्रोमबुक लाँच केला आहे. कंपनीने विद्यार्थी आणि फक्त करमणुकीसाठी लॅपटॉपचा वापर करणाऱ्या युजर्सचा विचार करून सादर केला आहे. हा एक क्रोम बुक आहे त्यामुळे यात गुगलची क्रोम ऑपरेटिंग सिस्टम मिळेल. मायक्रोसॉफ्ट विंडोजवरील अ‍ॅप्लिकेशनवर वापरता येणार नाहीत. या लॅपटॉपमध्ये AMD 3015Ce प्रोसेसर, AMD Radeon ग्राफिक्स, 4GB RAM आणि 64GB eMMC स्टोरेज देण्यात आली आहे.  

HP Chromebook x360 14a ची किंमत 

HP Chromebook x360 14a ची किंमत 32,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या सेल अंतर्गत हा लॅपटॉप 31,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा डिवाइस Ceramic White, Forest Teal आणि Mineral Silver कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध झाला आहे.  

HP Chromebook x360 14a चे स्पेसिफिकेशन्स  

HP Chromebook x360 14a मध्ये नावाप्रमाणे 14-इंचाचा डिस्प्ले मिळतो. हा एक टच-स्क्रीन पॅनल आहे जो 1366x768 पिक्सल रिजोल्यूशन, 250 निट्स पीक ब्राईटनेस आणि 45% NTSC कव्हरेजला सपोर्ट करतो. यातील 360-डिग्री हिन्ज लॅपटॉप टॅबलेट मोडमध्ये वापरण्यास मदत करतात. ऑनलाईन मिटींग्ससाठी कंपनीने 720p HD वाईड-विजन वेब-कॅम दिला आहे, तसेच यात ड्युअल अरे मायक्रोफोन आणि ड्युअल स्पीकर मिळतात.  

कंपनीने यात AMD 3015Ce प्रोसेसरचा वापर केला आहे. त्याचबरोबर AMD Radeon ग्राफिक्स, 4GB RAM आणि 64GB eMMC स्टोरेज मिळते. विशेष म्हणजे ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 256GB पर्यंत वाढवता येते. या क्रोमबुकसह एक वर्षासाठी 100GB क्लाउड स्टोरेज देखील मोफत मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी HP Chromebook x360 14a मध्ये Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, Bluetooth v5, दोन USB टाइप-C पोर्ट, एक USB टाइप-A पोर्ट आणि एक 3.5mm हेडफोन जॅक मिळेल. या डिवाइसमधील 47Whr ची बॅटरी 12.5 तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Web Title: Hp chromebook x360 14a launched in india with amd processor touch screen price specifications features availability 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.