11th जेनरेशन इंटेल कोर प्रोसेसरसह HP Envy 14 आणि Envy 15 लाँच; जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 03:03 PM2021-08-11T15:03:44+5:302021-08-11T15:04:28+5:30
भारतात HP Envy 14 (2021) ची किंमत 1,04,999 रुपयांपासून सुरु होते, तर HP Envy 15 (2021) ची प्रारंभिक किंमत 1,54,999 रुपये आहे.
HP ने भारतात आपल्या Envy सीरिजमध्ये Envy 14 (2021) आणि HP Envy 15 (2021) असे दोन लॅपटॉप लाँच केले आहेत. विंडोज 10 होम एडिशनसह सादर झालेले हे लॅपटॉप 11th जेन इंटेल कोर प्रोसेसरसह सादर करण्यात आले आहेत. सिंगल चार्जमध्ये हे लॅपटॉप 16.5 तासांची बॅटरी लाईफ देऊ शकतात, असा दावा कंपनीने केला आहे. विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टम उपलब्ध झाल्यावर हे दोन्ही लॅपटॉप त्यावर अपग्रेड करता येतील.
HP Envy 14 (2021) चे स्पेसिफिकेशन्स
नावाप्रमाणे HP Envy 14 (2021) मध्ये 14-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक WUXGA आयपीएस पॅनल आहे जो अँटी-ग्लेयर कोटिंग, 1920×1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 400 निट्स ब्राईटनेससह सादर करण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये 11th जेन टायगर लेक इंटेल कोर i7 प्रोसेसर आणि Nvidia GeForce GTX 1650 Ti ग्राफिक्स मिळतात. तसेच हा लॅपटॉप 16GB पर्यंत DDR4-3200MHz रॅम आणि 1TB PCIe NVMe TLC SSD स्टोरेजला सपोर्ट करतो.
HP Envy 14 (2021) मध्ये एक बॅकलिट कीबोर्ड, HD (720p) वेबकॅम, दोन मायक्रोफोन देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी या लॅपटॉपमध्ये Wi-Fi 6, ब्लूटूथ v5, 4 थंडरबोल्ट पोर्ट, 2 USB टाइप-A पोर्ट, 1 HDMI 2.0 पोर्ट, एक हेडफोन/ मायक्रोफोन कॉम्बो पोर्ट, मायक्रोएसडी कार्ड रीडर आणि एक फिंगरप्रिंट रीडर देण्यात आला आहे. या लॅपटॉपमधेही 63.3Whr लिथियम-आयन बॅटरी 16.5 तासांचा बॅटरी बॅकअप देते, असा दावा कंपनीने केला आहे.
HP Envy 15 (2021) चे स्पेसिफिकेशन्स
HP Envy 15 (2021) मध्ये 15.6-इंचाचा फुल एचडी आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1920×1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 400 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. यात 11th जेन इंटेल कोर i9 प्रोसेसर आणि Nvidia GeForce GN 20 E3 जीपीयू आहे. त्याचबरोबर 32GB पर्यंतचा DDR4 रॅम आणि 2TB पर्यंतची PCIe NVMe M.2 स्टोरेज देण्यात आली आहे. Envy 14 प्रमाणेच या लॅपटॉपमध्ये देखील वेबकॅम, इनबिल्ट मायक्रोफोन आणि इतर पोर्ट्स आहेत. HP Envy 15 (2021) मध्ये 83Whr लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे.
HP Envy 14 (2021) आणि Envy 15 (2021) ची किंमत
भारतात HP Envy 14 (2021) ची किंमत 1,04,999 रुपयांपासून सुरु होते, तर HP Envy 15 (2021) ची प्रारंभिक किंमत 1,54,999 रुपये ठेवण्यात आली आहे. दोन्ही लॅपटॉप नॅचरल सिल्वर रंगात HP वर्ल्ड स्टोर्स, HP ऑनलाइन पोर्ट आणि प्रमुख रिटेल स्टोर्समध्ये उपलब्ध होतील. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसह इतर प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइट्सवरून देखील हे लॅपटॉप विकत घेता येतील.