रिसायकल केलेल्या मटेरियलपासून बनलेले HP लॅपटॉप भारतात; डोळ्यांची काळजी घेणार आयसेफ सर्टिफिकेशन

By सिद्धेश जाधव | Published: April 20, 2022 04:33 PM2022-04-20T16:33:41+5:302022-04-20T16:34:08+5:30

HP Pavilion Series अंतगर्त नवीन लॅपटॉप HP Pavilion 15, HP Pavilion 14 आणि HP Pavilion X36 भारतात लाँच झाले आहेत.  

HP Pavilion Series Three New Laptop With 12th Gen Intel Processor Launched In India   | रिसायकल केलेल्या मटेरियलपासून बनलेले HP लॅपटॉप भारतात; डोळ्यांची काळजी घेणार आयसेफ सर्टिफिकेशन

रिसायकल केलेल्या मटेरियलपासून बनलेले HP लॅपटॉप भारतात; डोळ्यांची काळजी घेणार आयसेफ सर्टिफिकेशन

Next

HP Pavilion Series चा विस्तार कंपनीनं केला आहे. या सीरिजमध्ये इंटेलच्या लेटेस्ट 12th Gen प्रोसेसरसह तीन लॅपटॉप लाँच करण्यात आले आहेत. यांची नावं HP Pavilion 15, HP Pavilion 14 आणि HP Pavilion X360 अशी आहेत. कंपनीनं AMD प्रोसेसर असलेले दोन व्हेरिएंट देखील बाजारात सादर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे लॅपटॉप रिसायकल केलेल्या मटेरियलपासून बनवण्यात आले आहेत.  

HP Pavilion Series चे स्पेसिफिकेशन  

HP Pavilion 15 लॅपटॉप कॉम्पॅक्ट आणि पोर्टेबल डिजाईनसह सादर करण्यात आला आहे. यात मायक्रोसॉफ्ट हाय डायनॅमिक रेंज (HDR) स्ट्रीमिंग सपोर्ट मिळतो. साउंडसाठी यात बँग अँड ओल्फसेन ऑडियो सिस्टम मिळते. सध्या युजर्स जास्त काळ स्क्रीन समोर असतात त्यामुळे डोळ्यांवर ताण वाढतो म्हणून या लॅपटॉपमध्ये आयसेफ सर्टिफिकेशन देण्यात आलं आहे, जे ब्लु लाईट फिल्टर करून डोळ्यांना आराम देतं.  

या लॅपटॉपमध्ये लेटेस्ट 12th Gen Intel प्रोसेसर देण्यात आला आहे. HP ने लॅपटॉपच्या सर्व स्पेसिफिकेशनचा खुलासा केला नाही. परंतु काही रिपोर्ट्सनुसार, यात 16GB पर्यंत RAM आणि 512GB स्टोरेज देण्यात आली आहे. फुल-साईज बॅकलिट कीबोर्ड देण्यात आला आहे. हा लॅपटॉप Window 11 वर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी Pavilion 15 मध्ये 2 USB-A पोर्ट, 1 USB-C पोर्ट, ऑडियो जॅक आणि HDMI पोर्ट मिळतो. यात Bluetooth 5.2, WiFi 6 आणि MIMO टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. एचपीनं लॅपटॉपमध्ये 41Wh बॅटरी दिली आहे.  

किंमत 

Intel प्रोसेसर असलेल्या HP Pavilion 13 इंचाच्या लॅपटॉपची किंमत 60,999 रुपयांपासून सुरु होते. 15 इंचचा Intel प्रोसेसर असलेला मॉडेल 65999 रुपये, तर AMD प्रोसेसरसह 14 इंचाचा मॉडेल 55999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. AMD प्रोसेसर असलेला 15 इंचाचा लॅपटॉप 59999 रुपयांमध्ये मिळेल. HP Pavilion 14 इंच x360 ची किंमत 55999 रुपये आहे. हा लॅपटॉप Warm Gold, Natural Silver आणि Fog Blue मध्ये विकत घेता येईल.   

Web Title: HP Pavilion Series Three New Laptop With 12th Gen Intel Processor Launched In India  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.