HP Smart Tank 580: फोनवरून द्या कमांड, घर किंवा छोट्या व्यवसायासाठी आहे फायदेशीर डील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 10:00 PM2023-05-19T22:00:44+5:302023-05-19T22:01:31+5:30

आजकाल प्रिंटरच्या मदतीनं प्रिंट आऊट आणि फोटोकॉपी सारखी कामे सहज करता येतात.

HP Smart Tank 580 Command from phone great deal for home or small business technology | HP Smart Tank 580: फोनवरून द्या कमांड, घर किंवा छोट्या व्यवसायासाठी आहे फायदेशीर डील

HP Smart Tank 580: फोनवरून द्या कमांड, घर किंवा छोट्या व्यवसायासाठी आहे फायदेशीर डील

googlenewsNext

आजकाल प्रिंटरच्या मदतीनं प्रिंट आऊट आणि फोटोकॉपी सारखी कामे सहज करता येतात. परंतु अलीकडे पर्यंत, घर किंवा लहान ऑफिसेससाठी एक उत्तम प्रिन्टर निवडणं कठीण होतं. पण आता बाजारात चांगले कनेक्टिव्हिटी आणि कॉम्पॅक्ट असलेले अनेक पर्याय उपलब्ध आहेत. HP Smart Tank 580 Ink Tank हा असाच एक प्रिंटर आहे. जलद आणि सोपी कनेक्टिव्हिटी या प्रिन्टरचं वैशिष्ट्य आहे. इंकजेट प्रिंटरच्या तुलनेत, एचपीचा हा इंक टँक प्रिन्टर एक परवडणारा आणि उत्तम पर्याय आहे. या नवीन प्रिन्टरबद्दल आपण जाणून घेऊ.

हा एचपी स्मार्ट टँक 580 इंट टँक प्रिन्टर कॉम्पॅक्ट डिझाइनसह येतो. प्रिन्टरची बिल्ड क्वालिटीही अतिशय मजबूत आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कॉम्पॅक्ट डिझाइनमुळे ते लहान डेस्कवर सहजपणे ठेवता येऊ शकते. यामध्ये एक स्कॅनरही देण्यात आलाय. प्रिन्टरमध्ये एक छोटी स्क्रीन दिली आहे ज्यावर प्रिन्टींग स्टेटसही तुम्ही पाहू शकता. 

या एचपी प्रिंटरमध्ये कलर प्रिंट, ब्लॅक अँड व्हाइट प्रिंट, इन्फॉर्मेशन, पॉवर बटण अशी अनेक बटणे उपलब्ध आहेत. या प्रिन्टरमध्ये इंक टँक समोरील बाजून दिसतात. विशेष म्हणजे या इंक टँकमध्ये तुम्ही किती शाई आहे हेदेखील पाहू शकता. या कॉम्पॅक्ट प्रिन्टरमध्ये, पानांसाठी मागील बाजूस एक ट्रे देण्यात येतो. या प्रिंटरच्या साहाय्यानं एकाच वेळी ३० पानं प्रिन्ट करता येतात.

कशी आहे कनेक्टिव्हीटी

या प्रिन्टरला दुसर्‍या डिव्हाइसशी कनेक्ट करणं अतिशय सोपं आहे. सर्वप्रथम प्रिन्टरमधील इंक टँकमध्ये इंक भरा. विशेष म्हणजे तुम्ही या प्रिन्टरसोबत आलेलं यूजर मॅन्युअल पाहून सहज प्रिंट-रेडी करू शकता. जर तुम्ही प्रिन्टरला वाय-फायद्वारे कनेक्ट करत असाल, तर तुम्हाला तुमच्या फोनवर एच अॅप इंस्टॉल करणं आवश्यक आहे. यानंतर तुम्ही इतर कोणत्याही फोनवरून सहज प्रिन्ट करू शकता. या नव्या प्रिन्टरसोबत येणाऱ्या इंकच्या माध्यमातून १२००० ब्लॅक अँड व्हाईट पेजेस आणि ६ हजार कलर पेजेस प्रिन्ट करता येतात.

किती आहे किंमत?

केवळ१८८४८ रुपयांमध्ये तुम्ही हा प्रिन्टर विकत घेऊ शकता. यामध्ये एनर्जी सेव्हिंग ऑटो ऑन-ऑटो ऑफ टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलाय. आवश्यकता नसेल तेव्हा तुम्ही प्रिन्टर बंद किंवा गरज असताना तो चालू करू शकता. याचा प्रिन्टींगचा वेगही उत्तम असून मिनिटाला १०-१२ ब्लॅक अँड व्हाईज पेजेस आणि चार ते पाच कलर पेजेस प्रिन्ट करू शकता.

Web Title: HP Smart Tank 580 Command from phone great deal for home or small business technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.