एचपीचा नवीन लॅपटॉप येतोय भारतामध्ये, जाणून घ्या फिचर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 02:07 PM2018-07-11T14:07:06+5:302018-07-11T14:08:09+5:30

नवीन लॅपटॉपला भारतीय बाजारपेठेत उतारण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

HP's new laptop is coming in India, know feature | एचपीचा नवीन लॅपटॉप येतोय भारतामध्ये, जाणून घ्या फिचर

एचपीचा नवीन लॅपटॉप येतोय भारतामध्ये, जाणून घ्या फिचर

Next

एचपी कंपनीने आपल्या पॅव्हिलॉन या मालिकेतील एक्स ३६० या कन्व्हर्टीबल प्रकारातील नवीन लॅपटॉपला भारतीय बाजारपेठेत उतारण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

सध्या कन्व्हर्टीबल लॅपटॉपला अनेकांची पसंती मिळत आहे. यात लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारांमध्ये वापरण्याची सुविधा देण्यात आलेली असल्यामुळे विविध प्रोफेशन्समध्ये याचा वापर वाढला आहे. विशेष करून विद्यार्थी तसेच नोटस्ची आवश्यकता असणार्‍यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होत असतो. या पार्श्‍वभूमिवर, एचपी कंपनीचा पॅव्हिलॉन एक्स ३६० हा लॅपटॉपदेखील याच प्रकारातील अर्थात टु-इन-वन या पध्दतीत वापरण्याच्या सुविधेने सज्ज असणारा आहे. याची डिझाईन ही अतिशय आकर्षक अशीच आहे. याचे वजन अवघे १.६८ किलो इतके असल्यामुळे तो कुठेही सुलभपणे वापरता येतो. यातील डिस्प्ले हा १४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी अर्थात १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा आहे. यामध्ये अतिशय बारीक कडा प्रदान करण्यात आल्या आहेत.  यात बी अँड ओ ही अतिशय दर्जेदार ऑडिओ सिस्टीम देण्यात आलेली आहे.

यामुळे युजरला सुश्राव्य ध्वनीची अनुभूती घेता येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यात इंटेलच्या आठव्या पिढीतील कोअर आय-५ आणि आय-७ या प्रोसेसरचे पर्याय देण्यात आले आहेत. यात इंटेलच्या ऑप्टेन मेमरी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून यामुळे प्रोसेसींगचा वेग जवळपास २८ टक्क्यांनी वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याला एनव्हिडीयाच्या ग्राफीक प्रोसेसरची जोड देण्यात आली आहे. यामध्ये एचपीच्या फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाने सज्ज असणारी बॅटरी दिलेली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ११ तासांचा बॅकअप देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

एचपीच्या या लॅपटॉपमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा देण्यात आली असून यामुळे हे मॉडेल सुरक्षितपणे वापरता येणार आहे. तर यामध्ये १२० अंशाइतक्या वाईड अँगलने युक्त असणारा ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरादेखील देण्यात आला आहे. यावर स्टायलस पेनचा वापर करून रेखाटने करता येणार आहेत. याचा नोटस् घेण्यासाठीही वापर करता येणार आहे. याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य ५०,३४७ रूपयांपासून सुरू होणार आहे. हे मॉडेल ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये खरेदी करता येणार आहे.

Web Title: HP's new laptop is coming in India, know feature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.