HTC Wildfire E2 Plus: मजबूत फोन सादर करणाऱ्या HTC कंपनीनं केलं पुनरागमन; लाँच केला लो बजेट स्मार्टफोन
By सिद्धेश जाधव | Published: December 16, 2021 05:35 PM2021-12-16T17:35:02+5:302021-12-16T17:35:18+5:30
HTC Wildfire E2 Plus: कंपनीनं HTC Wildfire E2 Plus नावाचा नवा स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन 4GB RAM, 13MP कॅमेरा आणि 4600mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे.
HTC कंपनी गेले कित्येक महिने स्मार्टफोन मार्केटपासून दूर आहे. आपल्या मजबूत बिल्ड क्वॉलिटीसाठी ही कंपनी ओळखली जाते. आता कंपनीनं HTC Wildfire E2 Plus नावाचा नवा स्मार्टफोन सादर केला आहे. हा एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे. जो सध्या फक्त रशियन बाजारात सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.
HTC Wildfire E2 Plus चे स्पेसिफिकेशन्स
HTC Wildfire E2 Plus मध्ये 6.8 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये Unisoc Tiger T610 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर कंपनीनं दिली आहे. त्याचबरोबर 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा एचटीसी फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर असलेल्या या फोनमध्ये 4,600एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी HTC Wildfire E2 Plus च्या बॅक पॅनलवर क्वॉड कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा आहे. त्याचबरोबर 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
HTC Wildfire E2 Plus ची किंमत
रशियात HTC Wildfire E2 Plus चा एकमेव व्हेरिएंट सादर करण्यात आला आहे. तिथे या फोनची किंमत 12,990 रुबल ठेवण्यात आली आहे. ही किंमत 13,500 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन लवकरच जागतिक बाजारात देखील उपलब्ध होईल.
हे देखील वाचा:
फ्लिपकार्टचा जबरदस्त सेल सुरु; हे 8 मोबाईल फोन मिळतायत स्वस्तात....आयफोनही
सावधान! अँड्रॉईड फोनवर या 8 चुका करत असाल तर, घोटाळेबाजांना तुम्हीच मदत करताय