बजेट सेगमेंटमध्ये रेडमीला मागे टाकेल का नवीन Huawei Enjoy 20e? जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन
By सिद्धेश जाधव | Published: October 21, 2021 01:05 PM2021-10-21T13:05:05+5:302021-10-21T13:05:12+5:30
Huawei Enjoy 20e Budget Phone Luanch Price: Huawei Enjoy 20e स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यात Mediatek Helio G35 प्रोसेसर, 4GB RAM आणि 128GB Storage देण्यात आली आहे.
Huawei Enjoy 20e स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन कंपनीने बजेट सेगमेंटमध्ये सादर केला आहे. ज्यात Mediatek Helio G35 प्रोसेसर, 4GB RAM आणि 128GB Storage देण्यात आली आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. कंपनीने या फोनमध्ये सुपरसाउंड फीचर दिला आहे, ज्याची वॉल्यूम लेव्हल 86dB आहे.
Huawei Enjoy 20e ची किंमत
Huawei Enjoy 20e चे दोन व्हेरिएंट कंपनीने चीनमध्ये सादर केले आहेत. यातील 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 999 चायनीज युआन ठेवण्यात आली आहे, ही किंमत 11,700 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. या फोनच्या 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत मात्र समजली नाही. तसेच हा फोन भारतात कधी येईल हे देखील कंपनीने सांगितले नाही.
Huawei Enjoy 20e चे स्पेसिफिकेशन्स
यात 6.3-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी35 प्रोसेसर मिळतो, ज्याला PowerVR GE8320 GPU ची जोड देण्यात आली आहे. हा फोन कंपनीच्या HarmonyOS 2 वर चालतो. या मोबाईलमध्ये 4GB रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे, ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 512GB पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 13-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची डेप्थ लेन्स मिळते. फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10 वॉट रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करते.