हुआवे ऑनर 9 आय फ्लिपकार्टवर दाखल

By शेखर पाटील | Published: October 16, 2017 02:32 PM2017-10-16T14:32:22+5:302017-10-16T14:32:42+5:30

हुआवेचा ब्रँड असणार्‍या ऑनरने आपला ऑनर ९ आय हा फ्लॅगशीप स्मार्टफोन १७,९९९ रूपये मूल्यात फ्लिपकार्टवरून भारतीय ग्राहकांना उपलब्ध केला आहे.

Huawei Honor 9I file on Flipkart | हुआवे ऑनर 9 आय फ्लिपकार्टवर दाखल

हुआवे ऑनर 9 आय फ्लिपकार्टवर दाखल

Next

हुआवे ऑनर ९ आय हा स्मार्टफोन अलीकडेच जाहीर करण्यात आला होता. आता रविवारपासून फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून हे मॉडेल प्रेस्टीज गोल्ड, अरोरा ब्ल्यू आणि ग्रॅफाईट ब्लॅक या तीन रंगांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. यासोबत काही ऑफरदेखील देण्यात आल्या आहेत. यात एचडीएफसीच्या क्रेडीट वा डेबिट कार्डचा वापर करून हा स्मार्टफोन घेतल्यास १० टक्के सवलत मिळणार आहे. तर अ‍ॅक्सीसच्या क्रेडीट कार्डसाठी ५ टक्क्यांची सवलत असेल. याशिवाय बिनव्याजी इएमआय आणि ९,००० रूपयांची अ‍ॅश्युअर्ड बायबॅक ऑफरदेखील देण्यात आली आहे.

ऑनर ९ आय या स्मार्टफोनमध्ये ५.९ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी (२१६० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा २.५ डी वक्राकार डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात अतिशय गतीमान असा ऑक्टा कोअर किरीन ६५९ प्रोसेसर असेल. या स्मार्टफोनची रॅम ४ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे.हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारा असून यावर इएमयुआय ५.१ हा युजर इंटरफेस असेल. तर यात फास्ट चार्जिंगच्या सुविधेने सज्ज असरारी ३,३४० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनरही असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स आहेत.  

ऑनर ९ आय या स्मार्टफोनमध्ये फ्रंट व बॅक साईडला ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. अर्थात एकंदरीत चार कॅमेरे आहेत. यात मागील बाजूस एक कॅमेरा १६ तर दुसरा २ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा काढता येतात. यात ऑटो-फोकस, फेज डिटेक्शन, एलईडी फ्लॅश, टाईम लॅप्स, स्लो-मोशन व्हिडीओ कॅप्चर, पॅनोरामा आदी फिचर्स आहेत. तर सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी यात सॉफ्ट एलईडी फ्लॅशयुक्त १३ व २ मेगापिक्सल्स क्षमतांचे फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत. 

Web Title: Huawei Honor 9I file on Flipkart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.