हुआवे नोव्हा ३ : चार कॅमेर्यांसह उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश
By शेखर पाटील | Published: August 6, 2018 12:25 PM2018-08-06T12:25:13+5:302018-08-06T12:25:39+5:30
हुआवे या कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी नोव्हा ३ हा स्मार्टफोन सादर करण्याची घोषणा केली असून यामध्ये चार कॅमेर्यांसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.
हुआवे या कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी नोव्हा ३ हा स्मार्टफोन सादर करण्याची घोषणा केली असून यामध्ये चार कॅमेर्यांसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. सध्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये आता उत्तम कॅमेरे हे आवश्यक घटक म्हणून गणले जात आहेत. यात ड्युअल कॅमेरा सेटअपच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार प्रतिमा घेता येत असल्यामुळे याची लोकप्रियतादेखील वाढली आहे. आता अगदी किफायतशीर मूल्याच्या स्मार्टफोनमध्येही ड्युअल कॅमेर्यांची सुविधा देण्यात येत आहे. यातील बहुतांश दोन कॅमेरे हे मागील बाजूस असतात. तर मोजक्या मॉडेल्समध्ये पुढील बाजूसही ड्युअल कॅमेरे असतात. तथापि, हुआवे कंपनीने आपल्या नोव्हा ३ या स्मार्टफोनमध्ये पुढील आणि मागील बाजूस याच प्रकारातील ड्युअल कॅमेरे दिले आहेत. अर्थात यामध्ये एकूण चार कॅमेरे देण्यात आले आहेत.
हुआवेच्या नोव्हा ३ या स्मार्टफोनच्या मागील बाजूस एफ/१.८ अपर्चरयुक्त २४ आणि एफ/१.८ अपर्चरयुक्त १६ मेगापिक्सल्स क्षमतेच्या कॅमेरे देण्यात आले आहेत. तर याच्या पुढील बाजूस २४ आणि २ मेगापिक्सल्स क्षमतांचे कॅमेरे दिलेले आहेत. यामध्ये थ्रीडी क्युमोजी हे विशेष फिचर देण्यात आले आहे. याच्या मदतीने कुणीही अॅनिमेटेड त्रिमीतीय इमोजी तयार करू शकतो. यामध्ये किरीन ९७० हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते मायक्रो-एसडीच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. तर यामधील डिस्प्ले हा ६.३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस या क्षमतेचा असणार आहे.
हुआवे नोव्हा ३ हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरिओ ८.२ आवृत्तीवर आधारित इएमयुआय या प्रणालीवर चालणारे आहे. तर यातील बॅटरी मिलीअँपिअर क्षमतेची आहे. हुआवे नोव्हा ३ मॉडेलचे मूल्य ३४,९९९ रूपये असून हा स्मार्टफोन ग्राहकांना २३ ऑगस्टपासून प्रत्यक्षात खरेदी करता येणार आहे.