64MP कॅमेरा आणि 8GB RAM सह Huawei Nova 8 SE लाँच; जाणून घ्या किंमत
By सिद्धेश जाधव | Published: November 29, 2021 12:02 PM2021-11-29T12:02:38+5:302021-11-29T12:02:51+5:30
Huawei Nova 8 SE 4G स्मार्टफोन को चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यात 64MP Cameera, 8GB RAM आणि 16MP Selfie Camera देण्यात आला आहे.
Huawei नं आपल्या Nova 8 SE सीरिज अंतर्गत पहिला 4G फोन सादर केला आहे. दोन 5G Phone सादर केल्यानंतर आता कंपनीनं Nova 8 SE 4G स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. हा फोन किरिन 710ए प्रोसेसर, 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह बाजारात आला आहे. या हुवावे फोनमध्ये 64MP Camera असलेला क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे.
Huawei Nova 8 SE 4G चे स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल-एचडी+ ओलेड डिस्प्ले मिळतो. प्रोसेसिंगसाठी यात ऑक्टा-कोर किरिन 710ए चिपसेटचा वापर केला आहे, सोबत माली-जी51 जीपीयू मिळतो. हा डिवाइस 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह बाजारात आला आहे. हुवावे नोवा 8 एसई 4जी फोन HarmonyOS 2.0 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी हुवावे नोवा 8 एसई 4जी मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. हुवावे नोवा 8 एसई 4जी मध्ये 3,800mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 66 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Huawei Nova 8 SE 4G ची किंमत
Huawei Nova 8 SE 4G एच एकमेव व्हेरिएंट चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेल्या या मॉडेलची किंमत 2,099 चायनीज युआन (जवळपास 24,600 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा Huawei फोन चार कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे, ज्यात डार्क ब्लू, मॅजिक नाईट ब्लॅक, साकुरा स्नो क्लियर स्काय आणि सिल्वर मून स्टार यांचा समावेश आहे.