Huawei Nova 8 SE Vitality Edition लाँच; किंमत 21,800 रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 06:13 PM2021-07-28T18:13:27+5:302021-07-28T18:13:42+5:30
हुवावेने Huawei Nova 8 SE Vitality Edition स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये किरिन 710ए प्रोसेसर देण्यात आला आहे.
हुवावेने गेल्यावर्षी लाँच केलेल्या Huawei Nova 8 SE सीरिजमध्ये Huawei Nova 8 SE Vitality Edition नावाचा नवीन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. या फोनमध्ये कंपनीचा ऑक्टा-कोर किरिन प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 8GB रॅम आणि 48 मेगापिक्सलच्या ट्रीप रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Huawei Nova 8 SE Vitality Edition ची किंमत CNY 1,899 (अंदाजे 21,800 रुपये) आहे. हा फोन 8GB रॅम + 128GB स्टोरेजसह विकत घेता येईल.
Huawei Nova 8 SE Vitality Edition चे स्पेसिफिकेशन्स
हुवावे नोवा 8 एसई व्हायटिलिटी व्हायटिलिटी एडिशनमध्ये 6.6 इंचाचा फुल-एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा हुवावे फोन ऑक्टा-कोर किरिन 710ए प्रोसेसर आणि माली-जी51-एमपी4 जीपीयूवर चालतो. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 10 आधारित EMUI 10.1 देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी हुवावे नोवा 8 एसई व्हायटिलिटी एडिशन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. हा हुवावे फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हुवावे नोवा 8 एसई व्हायटिलिटी एडिशन मध्ये 4,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, ही बॅटरी 40 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.