64 मेगापिक्सल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट Huawei Nova 8i लाँच; जाणून घ्या किंमत  

By सिद्धेश जाधव | Published: July 7, 2021 02:41 PM2021-07-07T14:41:54+5:302021-07-07T14:45:35+5:30

Huawei Nova 8i launch: Huawei Nova 8i मध्ये स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट, 64 मेगापिक्सलचा कॅमेरा 4300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Huawei nova 8i launched with 64mp camera snapdragon 662 chipset and 4300mah battery check price  | 64 मेगापिक्सल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट Huawei Nova 8i लाँच; जाणून घ्या किंमत  

64 मेगापिक्सल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट Huawei Nova 8i लाँच; जाणून घ्या किंमत  

Next

Huawei ने आपल्या Nova 8 सीरिजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Huawei Nova 8i नावाने मलेशियामध्ये लाँच केला गेला आहे. हुवावे नोवा 8 आय मध्ये स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट, 64 मेगापिक्सलचा कॅमेरा 4300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

Huawei Nova 8i चे स्पेसिफिकेशन्स 

Huawe Nova 8i मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या हुवावे स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 662 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. Nova 8i स्मार्टफोन Android 10 आधारित EMUI 11 वर चालतो. 

Huawei Nova 8i च्या मागे क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेन्सर कंपनीने दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Huawei Nova 8i मध्ये 4300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 66W फास्ट चार्जला सपोर्ट करते.  

Huawei Nova 8i ची किंमत 

Huawei Nova 8i फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 8GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत मलेशियामध्ये 1,299 MYR (सुमारे 24,000 रुपये) ठेवण्यात आली आहे.  

Web Title: Huawei nova 8i launched with 64mp camera snapdragon 662 chipset and 4300mah battery check price 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.