Huawei चा नवीन बजेट स्मार्टफोन बाजारात दाखल; 5,000mAh बॅटरीसह Nova Y60 स्मार्टफोन लाँच
By सिद्धेश जाधव | Published: August 26, 2021 05:08 PM2021-08-26T17:08:31+5:302021-08-26T17:08:59+5:30
Huawei Nova Y60 Launch: Huawei Nova Y60 स्मार्टफोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात आला आहे.
अमेरिकेतील बंदीनंतर जागतिक बाजारावरील Huawei चे पकड सैल होत असल्याचे दिसत आहे. अनेक बाजारपेठांमधील गैरहजेरीचा फायदा शाओमीला होत आहे. परंतु हुवावेने अजून हार मानलेली नाही. आपल्या होम मार्केट चीननंतर कंपनी जागतिक बाजारात देखील नवनवीन स्मार्टफोन्स घेऊन येत आहे. आता कंपनीने जागतिक बाजारात अजून एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Huawei Nova Y60 लाँच केला आहे.
Huawei Nova Y60 चे स्पेसिफिकेशन्स
Huawei Nova Y60 मध्ये 6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. वॉटर ड्रॉप नॉच डिजाईनसह सादर केलेला हा डिस्प्ले एक टीएफटी एलसीडी आयपीएस पॅनल आहे. जो 16.7 दशलक्ष कलर्सना सपोर्ट करतो. हुवावेने या फोनमध्ये मीडियाटेकच्या हीलियो पी35 चिपसेटचा वापर केला आहे. या फोनमध्ये 4GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज मिळते, जी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित ईएमयुआय 11.0.1 वर चालतो.
Huawei Nova Y60 स्मार्टफोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. हा ड्युअल सिम फोन Histen 6.1 आडियो टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. तसेच यात 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
Huawei Nova Y60 ची किंमत
हुवावे नोवा वाय60 स्मार्टफोन सध्या दक्षिण आफ्रिकेत सादर करण्यात आला आहे. तिथे या फोनची किंमत ZAR 3,099 म्हणजे 15,000 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन Black आणि Crush Green रंगात विकत घेता येईल. भारतासह जगभरात हा फोन कधी येईल याची माहिती कंपनीने अजूनतरी दिलेली नाही.