5000mAh च्या दमदार बॅटरीसह आला Huawei Nova Y90; शानदार फीचर्ससह झाला लाँच
By सिद्धेश जाधव | Published: June 25, 2022 11:05 AM2022-06-25T11:05:49+5:302022-06-25T11:06:00+5:30
Huawei Nova Y90 स्मार्टफोन Snapdragon 690 प्रोसेसर, Android 12, 8GB RAM आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Huawei नं जागतिक बाजारात आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीच्या Huawei Nova Y90 स्मार्टफोनची जागतिक बाजारात एंट्री झाली आहे. स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा, Snapdragon 690 प्रोसेसर, Android 12, 8GB RAM, 40W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh ची बॅटरी असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. कंपनीची नोवा सीरिजमध्ये मिड रेंज स्मार्टफोन लाँच होतात, परंतु या नव्या हँडसेटच्या किंमत आणि उपलब्धतेची माहिती मात्र मिळाली नाही.
Huawei Nova Y90 चे स्पेसिफिकेशन्स
Huawei Nova Y90 स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा IPS LCD डिस्प्ले पंच होल डिजाईनसह देण्यात आला आहे. हा पॅनल 1080 x 2388 पिक्सल रिजोल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट, आणि 270Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 690 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. हा फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित EMUI 12 वर चालतो.
Nova Y90 स्मार्टफोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या मागे वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 50MP चा आहे, त्याचबरोबर 2MP चा डेप्थ आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 40W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.
या फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. या ड्युअल सिम 4G फोनमध्ये कनेक्टव्हिटीसाठी Wi-Fi 802.11ac, Bluetooth 5.0, GPS, USB-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक असे ऑप्शन मिळतात. हा डिवाइस तुम्ही क्रिस्टल ब्लू, पर्ल व्हाईट, एमराल्ड ग्रीन आणि मिडनाइट ब्लॅक ऑप्शनमध्ये विकत घेऊ शकता.