दिसणार नाही सेल्फी कॅमेरा पण झक्कास सेल्फी क्लीक होणार; लाँच झाला धमाल फोन
By सिद्धेश जाधव | Published: January 31, 2022 03:32 PM2022-01-31T15:32:18+5:302022-01-31T15:32:32+5:30
Huawei Nova Y9a: Huawei Nova Y9a मध्ये 8GB RAM, 128GB स्टोरेज, 64MP कॅमेरा आणि Pop Selfie Camera देण्यात आला आहे.
Huawei आपला नवीन आणि हटके स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीचा हा फोन Huawei Nova Y9a नावानं सादर करण्यात आला आहे. या फोनची खासियत म्हणजे यात मिळणारा पॉपअप सेल्फी कॅमेरा. जो स्मार्टफोनच्या बॉडीमध्ये लपून राहतो आणि सेल्फीची कमांड देताच हा कॅमेरा पॉप होतो. यामुळे डिस्प्लेवर मात्र कोणतीही नॉच किंवा होल दिसत नाही.
Huawei Nova Y9a चे स्पेसिफिकेशन्स
हुवावे नोवा वाय9ए स्मार्टफोनमध्ये 6.63 इंचाच फुलएचडी+ डिस्प्ले एलसीडी देण्यात आला आहे. हा अँड्रॉइड आधारित ईएमयुआय 10.1 वर चालतो. परंतु गुगल अॅप्स मिळत नाहीत त्याऐवजी एचएमएस सपोर्ट मिळतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 8GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी हुवावे नोवा वाय9ए स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी यातील 4,300mAh ची बॅटरी 40वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Huawei Nova Y9a ची किंमत
Huawei Nova Y9a सध्या दक्षिण आफ्रिकेत 6,499 ZAR (सुमारे 30,000 रुपये) मध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन Midnight Black, Sakura Pink आणि Space Silver कलरमध्ये विकत घेता येईल. या फोनच्या जागतिक लाँचची माहिती मात्र मिळाली नाही.
हे देखील वाचा:
स्मार्टफोनला कव्हर वापरताय? त्याचे तोटेही अनेक आहेत, समजल्यावर काढून टाकाल...