शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरसह Huawei P50 लाँच; 50MP कॅमेरा आणि 66W चार्जिंगची जोड
By सिद्धेश जाधव | Published: July 30, 2021 11:34 AM2021-07-30T11:34:42+5:302021-07-30T11:36:59+5:30
Huawei P50 Launch: Huawei P50 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. हा फोन हुवावे फोन 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,100एमएएचची बॅटरीला सपोर्ट करतो.
Huawei ने शक्तिप्रदर्शन करत दमदार ‘पी50 सीरीज‘ चीनमध्ये सादर केली आहे. या सीरिजमध्ये कंपनीने Huawei P50 आणि Huawei P50 Pro असे दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन फ्लॅगशिप प्रोसेसर, फास्ट चार्जिंग आणि शानदार कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात आले आहेत. या लेखात आपण हुवावे वी50 स्मार्टफोनची माहिती घेणार आहोत. (Huawei P50 and P50 Pro officially announced)
Huawei P50 चे स्पेसिफिकेशन्स
हुवावे पी50 मध्ये 6.5 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले 1224 x 2700 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. हा ओएलईडी पॅनल 300हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. Huawei P50 मध्ये कंपनीने HarmonyOS 2 दिला आहे. हा फोन क्वॉलकॉमच्या शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटवर चालतो. फोनमध्ये 8 जीबी रॅमपर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज नॅनो मेमरी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.
Huawei P50 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात फ्लॅश लाईटसह 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 13 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि ओआयएससह 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी हा फोन हुवावे फोन 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,100एमएएचची बॅटरीला सपोर्ट करतो.
Huawei P50 ची किंमत
हुवावे पी50 चीनीमध्ये दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला गेला आहे. या फोनच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 4,488 (अंदाजे 51,600 रुपये) आहे. तसेच 8GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंट CNY 4,988 (अंदाजे 57,300 रुपये) मध्ये विकत घेता येईल.