एकच नंबर! Huawei Watch मध्ये मिळणार ब्लड प्रेशर ट्रॅकिंग, लवकरच येणार बाजारात
By सिद्धेश जाधव | Published: November 1, 2021 05:26 PM2021-11-01T17:26:50+5:302021-11-01T17:27:26+5:30
Huawei Smart Watch With Blood Pressure Monitor: हुवावे या महिन्यात चीनमध्ये Blood Pressure आणि ECG ट्रॅक करणारा Smartwatch सादर करू शकते.
Huawei Smart Watch With Blood Pressure Monitor: हायपरटेन्शन अर्थात हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयरोगाची आणि हृदय विकाराच्या झटका अशा आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक Smartwatche मध्ये ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर आणि हार्ट रेट ट्रॅकिंग असे फिचर मिळतात. भविष्यात स्मार्टवॉच युजरचे ब्लड प्रेशर (Blood Pressure) देखील मोजू शकतील. ब्लड प्रेशर ट्रॅकिंग फिचर असलेला स्मार्टवॉच Huawei सर्वप्रथम सादर करू शकते, असे दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी चिनी टिपस्टर डिजिटल किंगने विबोवरून हुवावेच्या नव्या स्मार्टवॉचची माहिती दिली होती. या लीकनुसार हा स्मार्टवॉच नोव्हेंबरमध्ये लाँच केला जाऊ शकतो आणि यात पहिल्यांदाच ब्लड प्रेशर ट्रॅकर दिला जाऊ शकतो.
गेल्या महिन्यात गॉनडाँग विभागाच्या फूड अँड ड्रॅग अॅडमिनिस्ट्रेशनने मान्यता दिलेल्या डिव्हाइसेसची एक यादी प्रसिद्ध केली होती. यात एका हुवावे स्मार्टवॉचचा समावेश होता, ज्यात मेडिकल ग्रेड ECG (electrocardiogram) आणि ब्लड प्रेशर ट्रॅकर सपोर्ट मिळेल.
यावर्षी मे महिन्यात हुवावेच्या कन्ज्युमर बिजिनेस स्मार्टफोन कॅटेगरीचे प्रेजिडेन्ट हे गँग यांनी सांगितले होते कि, ब्लड प्रेशर डिटेक्शन असणाऱ्या कंपनीच्या पहिल्या स्मार्टवॉचने मेडिकल डिवाइस रेजिस्ट्रेशन टेस्ट पास केली आहे. त्यावेळी हा स्मार्टवॉच यावर्षीच्या उत्तरार्धात सादर केला जाईल असे सांगण्यात आले होते.
तसेच सप्टेंबरमध्ये EUIPO वरून कंपनीने Huawei Watch D मोनिकेरची नोंदणी केल्याची माहिती मिळाली होती. या डिवाइसमध्ये ब्लड प्रेशर ट्रॅकिंगचे फिचर मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. आता नोव्हेंबर उजडला आहे आणि कंपनी लवकरच ब्लड प्रेशर ट्रॅकर असलेला स्मार्टवॉच चीनमध्ये टीज करू शकते. आणि हा प्रोडक्ट नोटबुक, फ्रीबड्स लिपस्टिक ट्रू वायरलेस बड्स इत्यादींसह बाजारात उतरवला जाऊ शकतो.