10 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह Huawei Watch Fit भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: November 2, 2021 12:09 PM2021-11-02T12:09:46+5:302021-11-02T12:09:59+5:30
Smartwatch Under 10000 Rupees: SpO2 सेन्सर, Heart Rate मॉनिटरिंग फीचर्ससह Huawei Watch Fit Smartwatch भारतात लाँच झाला आहे.
Smartwatch Under 10K: हुवावेने भारतात आपला नवीन Smartwach सादर केला आहे. ऑगस्टमध्ये जागतिक बाजारात आलेला Huawei Watch Fit आता भारतीयांच्या भेटीला आला आहे. यात मोठा डिस्प्ले, 24×7 हार्ट रेट मॉनिटरिंग, 97 वर्कआउट मोड आणि ब्लड ऑक्सीजन मॉनिटरिंगसाठी SpO2 सेन्सर असे फीचर्स मिळतात. हा स्मार्टवॉच 10-दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे.
Huawei Watch Fit ची किंमत
Huawei Watch Fit ची किंमत 8,990 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टवॉचसोबत Sakura Pink, Isle Blue, Graphite Black आणि Pamelo Red कलरच्या स्ट्रॅपचा पर्याय उपलब्ध आहेत. हा डिवाइस अॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल.
Huawei Watch Fit चे स्पेसिफिकेशन्स
Huawei Watch Fit मध्ये 1.64-इंचाचा HD AMOLED डिस्प्ले मिळतो. या डिस्प्लेला 2.5D ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. हा डिस्प्ले ऑलवेज-ऑन डिस्प्ले आणि ऑटो-ब्राईटनेस अॅडजस्टमेंट फीचर्ससह बाजारात आला आहे. यात हार्ट रेट आणि स्लीप मॉनिटरिंग सारखे हेल्थ फीचर्स मिळतात. हा वॉच सिंगल चार्जमध्ये 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. Huawei Watch Fit मध्ये 5 ATM वॉटर रेजिस्टन्स फीचर देखील देण्यात आले आहे.
कस्टमायजेशनसाठी यात 130+ वॉच फेस मिळतात. यात रनींग, वॉकिंग, सायकलिंग आणि स्विमिंगसारखे 97 वर्कआउट मोड मिळतात. Huawei Watch Fit मध्ये Heart Rate, Step, Activity, Sleep, Menstrual Cycle आणि Blood Oxygen Saturation असे हेल्थ फिचर देण्यात आले आहेत. तसेच SMS, कॉल्स आणि इतर अॅप्ससाठी अलर्ट देखील या स्मार्टवॉचवर रिसिव्ह करता येतील. या वॉचच्या मदतीने फोनवरील म्यूजिक देखील नियंत्रित करता येईल.