सिंगल चार्जमध्ये 14 दिवस वापरता येणार Huawei चा शानदार Smartwatch; SpO2 आणि हार्ट रेट मॉनिटरसह झाला लाँच
By सिद्धेश जाधव | Published: October 22, 2021 05:29 PM2021-10-22T17:29:27+5:302021-10-22T17:29:42+5:30
Huawei Watch GT 3 Smartwatch Launch Details: Huawei Watch GT 3 चे दोन व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. ज्यांची किंमत 20,000 रुपयांपासून सुरु होते.
हुवावेने आपला नवीन स्मार्टवॉच Huawei Watch GT 3 लाँच केला आहे. या स्मार्टवॉचचे 42mm आणि 46mm असे मॉडेल कंपनीने बाजारात उतरवले आहेत. सध्या हा डिवाइस युरोपियन बाजारात उपलब्ध झाला आहे. यातील 42mm मॉडेलची किंमत 229 यूरो (सुमारे 20,000 रुपये) आणि 46mm व्हेरिएंटची किंमत 249 यूरो (सुमार 22,000 रुपये) आहे. येत्या काही दिवसांत हा स्मार्टवॉच भारतीय बाजारात देखील दिसू शकतो.
Huawei Watch GT 3 चे स्पेसिफिकेशन
या स्मार्टवॉचच्या छोट्या मॉडेलमध्ये 1.32 इंचाचा तर मोठ्या मॉडेलमध्ये 1.43 इंचाचा वर्तुळाकार अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा 1,000 पेक्षा जास्त वॉच फेसना सपोर्ट करतो. हा स्मार्टवॉच 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स ट्रॅक करू शकतो. वॉचमध्ये कंपनी ड्यूल बँड जीपीएस दिला आहे.
हेल्थ फिचर पाहता या स्मार्टवॉचमध्ये स्किन टेंपरेचर डिटेक्टकर, TruSeen 5.0+ हार्ट रेट मॉनिटर, SpO2 सेन्सर, एयर प्रेशर सेन्सर आणि स्लीप ट्रॅकिंग शानदार फीचर्स मिळतात. वॉच मध्ये बिल्ट-इन स्पिकर आणि मायक्रोफोन आहे, त्यामुळे यावर फोन कॉल रिसिव्ह करता येतात. तसेच हा स्मार्टवॉच 5ATM पर्यंत डस्ट आणि वॉटर रजिस्टेंससह सादर करण्यात आला आहे.
हुवावे वॉच GT 3 मध्ये 32MB रॅम आणि 4GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच ARM Cortex-M प्रोसेसरची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. या स्मार्टवॉचचा छोटा मॉडेल 7 दिवसांचा बॅकअप देतो. तर मोठा मॉडेल सिंगल चार्जवर 14 दिवस वापरता येईल, असा दावा कंपनीने केला आहे. हा स्मार्टवॉच वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.