आता या iPhone वर मिळणार २२ हजारांपर्यंत सूट, अर्ध्यापेक्षाही कमी किंमतीत खरेदी करता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 03:33 PM2022-06-04T15:33:37+5:302022-06-04T15:34:24+5:30
आता आयफोन घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अर्ध्यापेक्षाही कमी किंमतीत मिळू शकेल आयफोन.
आता आयफोन घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. Flipkart वर चालणाऱ्या बिग बचत धमाल सेलमध्ये iPhone SE मॉडेल्स मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहेत. तुम्ही या फोनचे 64GB व्हेरिएंट अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. जर तुम्हीही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच ही डील सोडू नका. पाहूया नक्की काय आहे ही स्कीम.
सध्या फ्लिपकार्टवर बिग बचत धमाल सेल सुरू आहे. हा सेल ५ जून पर्यंत लाइव्ह असेल. या सेलदरम्यान, आयफोनच्या मॉडेल्सवर मोठे डिस्काऊंट मिळणार आहे. आपण जाणून घेऊ iPhone SE च्या कोणत्या मॉडेलवर किती डिस्काऊंट मिळेल.
कशावर मिळतोय डिस्काऊंट?
Flipkart लिस्टिंगनुसार iPhone SE 64GB स्टोरेज वेरिएंटची किमत ₹39,900 आहे. परंतु 23 टक्के सवलतीसह तो मोबाइल केवळ ₹30,499 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या मॉडेलवर ₹ 12,500 पर्यंत एक्सचेंज बोनस आहे. समजा तुम्हाला जुना फोन देऊन पूर्ण फायदा मिळत असेल, तर फोनची किंमत फक्त ₹17,999 रुपये असेल. म्हणजेच एमआरपीशी तुलना केल्यास निम्म्याहून कमी किंमतीत हा फोन घेण्याची संधी मिळत आहे.
Flipkart च्या लिस्टिंगनुसार iPhone SE 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ₹44,900 आहे. परंतु 20 टक्के सूटसह तो फक्त ₹35,499 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या मॉडेलला ₹12,500 पर्यंत एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे. समजा तुम्हाला जुना फोन देऊन पूर्ण फायदा मिळत असेल तर फोनची किंमत फक्त ₹22,999 रुपये असेल.
Flipkart लिस्टिंगनुसार iPhone SE 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ₹54,900 आहे. परंतु 17 टक्के सवलतीसह तो ₹45,099 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या मॉडेलवर ₹ 12,500 पर्यंत एक्सचेंज बोनस देखील आहे. जुना फोन देऊन तुम्हाला पूर्ण फायदा मिळत असेल, तर फोनची किंमत फक्त ₹ 32,599 रुपये असेल. 256GB व्हेरियंटवर बँकिंग ऑफर आणि फ्रीबिजही उपलब्ध आहेत. तुम्ही हा फोन दरमहा ₹1542 च्या EMI वर घरी देखील आणू शकता. दरम्यान, तुम्हाला देण्यात येणाऱ्या एक्सचेंज ऑफरची रक्कम ही तुमच्या फोनच्या कंडिशनप्रमाणे बदलू शकते.