पुन्हा पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर; फक्त 555 रुपयांमध्ये Realme चा दमदार फोन होईल तुमचा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 06:22 PM2022-03-28T18:22:03+5:302022-03-28T18:22:11+5:30

Realme 8 स्मार्टफोनमध्ये 64MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 8GB रॅम असे दमदार स्पेसिफिकेशन्स मिळतात.

Huge Discount On Realme 8 In Flipkart Electronics Sale   | पुन्हा पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर; फक्त 555 रुपयांमध्ये Realme चा दमदार फोन होईल तुमचा 

पुन्हा पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर; फक्त 555 रुपयांमध्ये Realme चा दमदार फोन होईल तुमचा 

Next

Flipkart Electronics Sale चा आज दुसरा दिवस आहे. 27 मार्च ते 31 मार्च 2022 या कालावधीत अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर फ्लिपकार्ट भरघोस डिस्काउंट देत आहे. ज्यात Realme 8 स्मार्टफोनवर आतापर्यंतची मोठी सवलत दिली जात आहे. स्मार्टफोनमध्ये 64MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 8GB रॅम असे दमदार स्पेसिफिकेशन्स देखील मिळतात.  

Realme 8 वरील ऑफर्स 

Realme 8 स्मार्टफोन 16,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे. परंतु फ्लिपकार्टवरून हा फोन 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. HDFC, SBI आणि Axis बँकेच्या क्रेडिट व डेबिट कार्डवर 3250 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. थेट डिस्काउंट आणि बँक ऑफर्सनंतर हा फोन 12,749 रुपयांमध्ये विकत घेता येईल. किंवा तुम्ही ईएमआयवर देखील हा डिवाइस विकत घेऊ शकता. फ्लिपकार्टवर ईएमआयची सुरुवात 555 रुपयांपासून होते.  

Realme 8 चे स्पेसिफिकेशन्स 

फोनमध्ये 6.4 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं यात Helio G95 गेमिंग प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे क्वॉड कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाईड सेन्सर, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चौथा कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटला 16 MP चा सेल्फी शुटर मिळतो. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Web Title: Huge Discount On Realme 8 In Flipkart Electronics Sale  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.