"माझा मृत्यू झाला असता..." Apple Watch'ने दिली हृदयविकाराची सूचना, महिलेनं केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 12:19 PM2023-01-17T12:19:34+5:302023-01-17T12:19:55+5:30
आजचे युग हे डिजीटल युग म्हणून ओळखले जाते. आज तंत्रज्ञान अनेक पटींनी पुढ गेले आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर ते लोकांचे जीवन बदलू शकते.
आजचे युग हे डिजीटल युग म्हणून ओळखले जाते. आज तंत्रज्ञान अनेक पटींनी पुढ गेले आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर ते लोकांचे जीवन बदलू शकते. अनेक कंपन्यांनी डिजीटल वॉच लाँच केली आहेत. अॅपलनेही लाँच केले आहे. या वॉचमध्ये अशी अनेक तंत्रे पाहायला मिळतात. ऍपल वॉच अनेक वेळा जीवनरक्षक असल्याचे सिद्ध झाले आहे. हृदय गती, ECG आणि बरेच काही मोजणारे सेन्सर वापरून वापरकर्त्यांच्या आरोग्यातील असामान्यता शोधून त्याचा जीव कसा वाचवला याबद्दल अनेक घटना आपण वाचल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे.
यूकेमधील एका महिलेने या संदर्भात दावा केला आहे. ऍपल वॉचने महिलेला हृदयविकाराचा इशारा दिला होता, यामुळे तिचे प्राण वाचल्याचा दावा महिलेने केला आहे.
एका अहवालानुसार, 59 वर्षीय इलेन थॉम्पसन 2022 ला हृदयविकाराचा झटका आला होता, तेव्हापासून ती तिच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी गॅझेट वापरत आहे. घड्याळाला अलीकडेच थॉम्पसनच्या हृदयाच्या लयमध्ये काहीतरी गडबड आढळून आली आणि त्यांना त्याबद्दल सावध केले. त्या महिलेने ती नोटीफीकेशन गांभीर्याने घेत लवकरच हृदयरोगतज्ज्ञांना भेट दिली, यामुळे त्यांना मॉनिटर दिला. या मॉनिटरच्या सहाय्याने थॉम्पसन यांना त्यांच्या हृदयाचे निरीक्षण करावे लागले. दरम्यानच्या, काळात मॉनिटरने हॉस्पिटलला एक अलर्ट पाठवला, ज्यामध्ये त्या झोपेच्या 19 सेकंदात खाली पडल्याचे दाखवले.
या दरम्यान लगेचच थॉम्पसन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांना त्याच्या हृदयात एट्रिओव्हेंट्रिक्युलर ब्लॉक आढळला, ज्यामुळे त्या हळू हळू आणि असामान्य लयसह धडकत होते. NHS च्या मते, ही एक गंभीर स्थिती आहे.
डॉक्टरांनी त्यांना पेसमेकर लावला. यावेळी त्या महिलेला त्यांच्या मुलीने फोन करुन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी सूचना दिली. यानंतर दुसऱ्याच दिवशी मी पेसमेकर बसवला, त्यामुळे आज मी निरोगी आहे. आज मला वाटते की ऍपलच्या घड्याळाने मला इशारा दिला नसता, तर माझ्यासोबत काहीही झाले असते, असंही त्या महिलेने सांगितले.
याविषयी माहिती देणारी महिला आता तिच्या ऍपल वॉचला श्रेय देते. त्यामुळे माझे प्राण वाचले असे ती म्हणते. जर मला इशारा मिळाला नाही तर मी डॉक्टरकडे गेली नसती. आता मी नेहमी ऍपल वॉच वापरते, असंही महिला म्हणाली.
धांसू Trick! कोणाला न कळताच कॉल, मेसेज करा, तुमचा नंबरही दिसणार नाही...
गेल्या काही दिवसापूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. यात ऍपल वॉचने 16 वर्षांच्या मुलाला त्याच्या शरीरात कमी रक्त ऑक्सिजन संपृक्तता शोधून वेळेवर उपचार मिळण्यास मदत केली.