'iPhone'ची मोठी घोषणा; आता 'I'चा अर्थ इंडिया, चीनला मोठा धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 11:20 AM2020-07-24T11:20:16+5:302020-07-24T11:21:20+5:30

अॅपलच्या 'I' फोनची सर्वांनाच भुरळ आहे. त्यामुळे iPhoneच्या नवीन मॉडलची सर्वांनाच उत्सुकता असते. हे फोन महागडे असले तरी भारतात ...

The 'i' in iPhone 11 now stands for India-made: Apple for the first time makes a top-of-the-line model in the country | 'iPhone'ची मोठी घोषणा; आता 'I'चा अर्थ इंडिया, चीनला मोठा धक्का!

'iPhone'ची मोठी घोषणा; आता 'I'चा अर्थ इंडिया, चीनला मोठा धक्का!

googlenewsNext

अॅपलच्या 'I' फोनची सर्वांनाच भुरळ आहे. त्यामुळे iPhoneच्या नवीन मॉडलची सर्वांनाच उत्सुकता असते. हे फोन महागडे असले तरी भारतात त्याचा मोठा ग्राहक आहे. भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी iPhone ने जाहीर केली आहे. आता अॅपल iPhone11ची निर्मिती भारतात करणार आहे आणि देशात प्रथमच iPhone 11 ची निर्मिती होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या मेक ईन इंडिया मोहिमेसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. त्याशिवाय चीनच्या कुरापतींमुळे देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरत असलताना अॅपलच्या या निर्णयानं चीनलाही मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

IPL 2020 ची फायनल 8 नोव्हेंबरला; जाणून घ्या भारतीय खेळाडू UAEला कधी होणार रवाना

'इकॉनॉमिक टाईम्स'ने या संदर्भातले वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ''चेन्नईत याची निर्मिती केली जाणार असून उत्पादन टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येणार आहे. भारतात तयार होणाऱ्या या iPhone 11ची निर्यातही केली जाऊ शकते. त्यामुळे चीनवर आता अधिक विसंबून राहणे कमी करता येईल,''असे उद्योग क्षेत्रातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'इकॉनॉमिक टाईम्स'ला सांगितले. चीनमध्ये तयार झालेल्या iPhone 11 ची विक्री भारतात करण्याच्या पर्यायाचा विचार सध्या करत नसल्याचे अधिकाऱ्यानं सांगितले. अॅपलच्या या निर्णयामुळे त्यांचा 22% आयात कर वाचणार आहे. 

मान गए Apple! तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनवर जबरी वार; प्रकल्पच भारतात हलवणार

याव्यतिरिक्त बंगळुरू येथील विस्ट्रोन प्लांट येथे  iPhone SE च्या निर्मितीचा विचार सुरू असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. केंद्राकडून production linked incentive (PLI) schemeचा फायदाही अॅपलला मिळणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे देशातील अॅपल उप्तादनाच्या स्थानिकीकरणातही वाढ होणार आहे. याशिवाय चीनबाहेर अॅपलला त्यांच्या उप्तादनाचे जाळे पसरवता येणार आहे. 

Web Title: The 'i' in iPhone 11 now stands for India-made: Apple for the first time makes a top-of-the-line model in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.