आयबॉल काँपबुक एइआर बिझनेस लॅपटॉप : काय आहेत फिचर्स ?

By शेखर पाटील | Published: August 29, 2017 09:08 AM2017-08-29T09:08:17+5:302017-08-29T09:09:49+5:30

आयबॉल कंपनीने आयबॉल काँपबुक एइआर हा बिझनेस लॅपटॉप भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.

Iblek Kumpbook Ar Business Laptop: What Are Factors? | आयबॉल काँपबुक एइआर बिझनेस लॅपटॉप : काय आहेत फिचर्स ?

आयबॉल काँपबुक एइआर बिझनेस लॅपटॉप : काय आहेत फिचर्स ?

Next

आयबॉल काँपबुक एइआर हा लॅपटॉप विशेष करून कार्पोरेट क्षेत्रात कार्यरत प्रोफेशनल्ससाठी लाँच करण्यात आल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात प्रॉडक्टीव्हिटी आणि मॅनेजमेंटशी संबंधीत टुल्स परिणामकारकरित्या वापरता येत असल्याचा दावादेखील करण्यात आला आहे. याचा डिस्प्ले ३६० अंशात फिरवता येतो. यात आरडीएस३टीएनइडब्ल्यू ( रोबोस्ट डबल स्पिंडल ३६० डिग्री टेक्नॉलॉजी) या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे हा लॅपटॉप नोटबुक, स्टँड, टेंट आणि टॅबलेट या चार पध्दतींनी वापरणे शक्य आहे. अलीकडच्या काळात टु-इन-वन या प्रकारातील म्हणजेच लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारात वापरण्यास सक्षम असणारे अनेक मॉडेल्स लाँच करण्यात येत आहेत. मात्र यात देण्यात आलेले चार मोड हे फिचर लक्षणीय असेच आहे. बाह्यांगाचा विचार केला असता हा लॅपटॉप सोनेरी रंगात आणि उत्तम दर्जाच्या मेटॅलिक बॉडीसह ग्राहकांना सादर करण्यात आला आहे.

आयबॉल काँपबुक एइआर बिझनेस लॅपटॉप या मॉडेलमध्ये मल्टी-फंक्शन टाईप-सी सपोर्ट देण्यात आला आहे. यामुळे याच्या मदतीने जलद गतीने चार्जींग व डाटा ट्रान्सफरसह नेटवर्क कनेक्टिव्हिटीचेही काम पार पाडणे शक्य आहे. तसेच यात कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल बँड वाय-फाय, ब्ल्यू-टुथ, एचडीएमआय व युएसबी ३.० पोर्ट आदी पर्यायदेखील असतील. उत्तम दर्जाच्या श्रवणानुभुतीसाठी यात क्वॉड स्पीकर देण्यात आले आहेत. आयबॉल काँपबुक एइआर बिझनेस लॅपटॉप विंडोज हॅलो म्हणजेच अत्यंत सुरक्षित अशा फिंगरप्रिंट स्कॅनरने सज्ज असेल. याच्या मदतीने लॅपटॉप लॉक व अनलॉक करणे सुलभ आणि सुरक्षित असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

आयबॉल काँपबुक एइआर बिझनेस लॅपटॉप या मॉडेलमध्ये १३.३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १०८० बाय १९२० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस टचस्क्रीन डिस्प्ले असेल. तर यात पॉवर सेव्हींग फिचरसह ३७ वॅट क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. अवघे १.४८ किलोग्रॅम वजन असणारा हा लॅपटॉप २ मेगापिक्सल्स क्षमतेच्या वेबकॅमने सज्ज असून विंडोज १० प्रणालीवर चालणारा असेल. आयबॉल काँपबुक एइआर बिझनेस लॅपटॉप या मॉडेलचे मूल्य ३४,९९९ रूपये असले तरी सवलतीच्या दरात हा लॅपटॉप २९,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांमध्येच हा लॅपटॉप देशभरातील शॉपीजमधून उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही कंपनीने नमूद केले आहे.
 

Web Title: Iblek Kumpbook Ar Business Laptop: What Are Factors?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.