एअरटेलनंतर आता आयडिया, व्होडाफोनही देणार स्वस्त ४ जी स्मार्टफोन, जिओला टक्कर देण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 08:21 AM2017-10-14T08:21:05+5:302017-10-14T08:24:19+5:30

आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन या कंपन्यांनीही आता आपल्या ग्राहकांना स्वस्तात ४ जी स्मार्टफोन देण्याची योजना आखली आहे. त्यांच्या फोनची प्रभावी किंमतही १,५00 रुपयांच्या आसपास राहणार आहे.

Idea and Vodafone will now offer affordable 4G smartphones, companies to compete in the competition | एअरटेलनंतर आता आयडिया, व्होडाफोनही देणार स्वस्त ४ जी स्मार्टफोन, जिओला टक्कर देण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा

एअरटेलनंतर आता आयडिया, व्होडाफोनही देणार स्वस्त ४ जी स्मार्टफोन, जिओला टक्कर देण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा

Next
ठळक मुद्देआयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन या कंपन्यांची ग्राहकांना स्वस्तात ४ जी स्मार्टफोन देण्याची योजनाफोनची प्रभावी किंमत १,५00 रुपयांच्या आसपास आयडिया आणि व्होडाफोन या कंपन्या महाविलीनीकरणाच्या प्रक्रियेतही आहेत

मुंबई - आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन या कंपन्यांनीही आता आपल्या ग्राहकांना स्वस्तात ४ जी स्मार्टफोन देण्याची योजना आखली आहे. त्यांच्या फोनची प्रभावी किंमतही १,५00 रुपयांच्या आसपास राहणार आहे.

रिलायन्स जिओने पहिल्यांदा स्वस्त फोन देण्याची योजना जाहीर केली होती. त्यानंतर भारतीय एअरटेलनेही अशीच घोषणा केली. जिओच्या फोनची प्रभावी किंमत १,५00 रुपये, तर एअरटेलच्या फोनची प्रभावी किंमत १,३९९ रुपये आहे. आता व्होडाफोन आणि आयडिया या स्पर्धेत उतरल्या आहेत. या कंपन्या लावा आणि कार्बन या हँडसेट उत्पादक कंपन्यांशी चर्चा करीत आहेत. विशेष म्हणजे आयडिया आणि व्होडाफोन या कंपन्या महाविलीनीकरणाच्या प्रक्रियेतही आहेत. या वृत्तास लावा आणि कार्बन या कंपन्यांच्या सूत्रांकडून दुजोरा मिळाला आहे. लावाचे उत्पादन प्रमुख गौरव निगम यांनी सांगितले की, आम्ही तीनही कंपन्यांशी चर्चा करीत आहोत. अजून अंतिम निर्णय झालेला नाही.

नोकिया आणणार स्वस्त फोर-जी फिचर फोन
नोकिया ब्रँडची मालकी असणार्‍या एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकियाचे जोरदार रिलाँचिंग केले आहे. याच्या अंतर्गत नोकिया ८ या फ्लॅगशीप स्मार्टफोनसह अन्य काही किफायतशीर मॉडेल्सदेखील सादर करण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर कधी काळी प्रचंड गाजलेल्या नोकिया ३३१० या मॉडेलची थ्री-जी आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येईल असे वृत्त मध्यंतरी आले होते. तथापि, भारतातील फोर-जी नेटवर्कचा वाढता आलेख पाहता नोकिया कंपनी याऐवजी अत्यंत स्वस्त मूल्यात फोर-जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी असणारा फिचर फोन सादर करण्याची माहिती समोर आली आहे. एचएमडी ग्लोबल कंपनीच्या भारतीय विभागाचे उपाध्यक्ष अजय मेहता यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. जिओफोनला मिळालेल्या प्रतिसादानंतर आपली कंपनी भारतात अत्यंत किफायतशीर मूल्यात फोर-जी फिचरफोन लाँच करण्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. यात जिओफोनप्रमाणे फोर-जी आणि फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्कचा सपोर्ट असेल. 

BSNL आणणार स्वस्त स्मार्टफोन
बीएसएनएलने लाव्हा आणि मायक्रोमॅक्स या स्मार्टफोन मेकर कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी 2 हजार 500 रुपयांहून कमी किंमतीचा स्मार्टफोन वेगवेगळ्या ऑफर्ससोबत मार्केटमध्ये घेऊन येणार असल्याचे समजते. बीएसएनएलचे अधिकारी के. रामाचंद यांच्या माहितीनुसार, स्वस्त दरात स्मार्टफोन उपलब्ध करुन देण्यासाठी बीएसएनएलने मायक्रोमॅक्स आणि लाव्हा कंपनीसोबत भागिदारी केली आहे. मात्र या स्मार्टफोनची नक्की किंमत किती असेल, याबाबत सध्या विचार सुरु आहे.

सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच सीओएआयच्या रिपोर्टनंतर बीएसएनएलने स्मार्टफोनबाबतची घोषणा केली. या रिपोर्टनुसार, 16 टक्क्यांपर्यंत इंटरनेट ग्रामीण भागात वापरला जातो. ग्रामीण भागात बीएसएनएलचे ग्राहक चांगल्या प्रमाणात असल्याने बीएसएनएलने स्मार्टफोनबाबतही विचार सुरु केला आहे.

Web Title: Idea and Vodafone will now offer affordable 4G smartphones, companies to compete in the competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.