iPhone 12 चा डिस्प्ले फुटला तर समजा नशीब फुटले; खर्च पाहून रामराम म्हणाल

By हेमंत बावकर | Published: October 20, 2020 10:00 AM2020-10-20T10:00:42+5:302020-10-20T10:03:31+5:30

Iphone 12 Repairing Cost : iPhone 12 मध्ये सिरॅमिक शिल्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार हा डिस्प्ले आधीच्या डिस्प्लेंपेक्षा चारपटींनी मजबूत आहे.

If the display of iPhone 12 is broken, let's say luck is broken; repairing cost 40000 | iPhone 12 चा डिस्प्ले फुटला तर समजा नशीब फुटले; खर्च पाहून रामराम म्हणाल

iPhone 12 चा डिस्प्ले फुटला तर समजा नशीब फुटले; खर्च पाहून रामराम म्हणाल

googlenewsNext

नवी दिल्ली : कॅलिफोर्नियाची कंपनी अ‍ॅपलने नुकतेच चार iPhone 12 ची मॉडेल्स लाँच केली आहेत. हे फोन महाग तर आहेतच परंतू तेवढेच सांभाळून ठेवावे लागणार आहेत. iPhone 12 च्या मॉडेल्समध्ये iPhone 11 पेक्षा जास्त फिचर देण्यात आली आहेत. iPhone 11 हा गेल्यावर्षीचा बेस्ट सेलिंग स्मार्टफोन होता. iPhone 12 जर समजा हातातून पडला तर तुमच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकणार आहे. कारणही तसेच आहे. 


iPhone 12 मध्ये सिरॅमिक शिल्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार हा डिस्प्ले आधीच्या डिस्प्लेंपेक्षा चारपटींनी मजबूत आहे. युजर यामध्ये स्कॅच आणि ड्रॉप प्रोटेक्शनची मोठी आशा ठेवू शकतात. परंतू जर काही हा डिस्प्ले फुटला तर मात्र या आयफोन प्रेमीचा मोठा हिरमोड होणार आहे. कारण त्यासाठी त्याला नव्या फोनच्या जवळपास निम्मी किंमत मोजावी लागणार आहे. 


जर नव्या आयफोन 12 चा हा सिरॅमिक डिस्प्ले कोणत्याही कारणाने तुटला तर गेल्या वर्षीच्या आयफोन 11 च्या स्क्रीनसाठी मोजावी लागणारी रक्कम 80 डॉलरपेक्षा (5,800 रुपये) जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. अ‍ॅपलने आयफोन १२ मध्ये OLED XDR Retina पॅनल दिले आहे. यावर हे सिरॅमिक ग्लास प्रोटेक्शन दिले आहे. आयफोन 11मध्ये मिळणाऱ्या LCD Retina डिस्प्लेच्या तुलनेत मोठी अपग्रेड आहे. 


डिस्प्ले तुटला तर....
iPhone 12 चा वॉरंटीनंतर डिस्प्ले बदलायचा असेल तर त्यासाठी 279 डॉलर (20,500 रुपये) मोजावे लागणार आहेत. याशिवाय iPhone 12 Pro व iPhone 12 Pro Max च्या नव्या स्क्रीनसाठी हा खर्च आणखी वाढणार आहे. हा खर्च किती असेल यावर अ‍ॅपलने अद्याप जाहीर केलेले नाही. iPhone 12 Mini ची स्क्रीन छोटी असल्याने त्याचा खर्चही कमी असण्याची शक्यता आहे. 


आयफोन 12 ची कोवळ स्क्रीन फुटली तर 20000 रुपयेच खर्च येईल परंतू जर त्यासोबत अदर डॅमेज झाले तर 449 डॉलर (33,000 रुपये) खर्च येणार आहे. गेल्या वर्षीच्या आयफोन 11 साठी हा खर्च 399 डॉलर होता. अशाप्रकारे iPhone 12 Pro ची रिपेअर कॉस्ट 549 डॉलर (40,300) होणार आहे. AppleCare+ साठी 99 डॉलर दिल्यास बॅटरी रिप्लेसमेंटचा खर्च हा 69 डॉलर म्हणजेच 5000 रुपये येणार आहे. 

Web Title: If the display of iPhone 12 is broken, let's say luck is broken; repairing cost 40000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल