Meta नं आईला जॉबवरुन काढलं तर मुलगी खुश झाली, कारण ऐकून चक्रावून जाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 12:15 PM2022-12-12T12:15:18+5:302022-12-12T12:15:36+5:30
फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटानं हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
नवी दिल्ली-
फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटानं हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कर्मचारी कपातीमध्ये Shelly Kalish नावाच्या महिलेची नोकरीही गेली. पण यामुळे त्यांची ६ वर्षाची मुलगी मात्र खूष झाली आहे. बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार Shelly Kalish नं सांगितलं की त्यांची मुलगी सहा वर्षांची आहे. ती आपल्या आईची नोकरी गेल्यामुळे खूश झाली आहे. कारण आपल्याला आता आईसोबत जास्त वेळ व्यतित करता येणार यासाठी ती खूश झाली आहे.
मेटानं नुकतंच ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं. यात बहुतांश कर्मचाऱ्यांनी त्यांना नोकरीवरुन कोणत्या कारणावरुन काढून टाकण्यात आलं आहे याची माहितीच दिली गेलेली नाही. पण आपल्या आईची नोकरी गेल्यामुळे Shelly Kalish यांची मुलगी जाम आनंदी झाली आहे.
Shelly Kalish यांनी सांगितलं की सकाळी साडेसहा वाजता उठून मेल चेक केला असता त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आल्याचं कळलं. मेल वाचून त्या निराश झाल्या. कंपनीनं कामावरुन काढण्यात आल्याचं कळताच त्यांनी पतीला कॉल केला. पती आणि मुलगी घरी आल्यानंतर त्यांना मिठीच मारली.
आपली नोकरी गेल्याचं त्यांनी मुलीला सांगितलं आणि मुलगी दु:खी होण्याऐवजी आनंदीच झाली. "नोकरी जाणं खूप निराशाजनक आणि दु:ख देणारं असतं. पण माझ्या लेकीची प्रतिक्रिया वेगळीच होती. नोकरी गेल्याचं कळताच तू सगळ्यात बेस्ट मॉम आहेस असं लेक म्हणाली आणि मला मिठी मारली. आता तुझ्यासोबत जास्त वेळ व्यतित करता येईल असं तिचं म्हणणं होतं", असं नोकरी गमावलेल्या Shelly Kalish म्हणाल्या.