फोन चोरीला गेल्यास सर्वप्रथम करा 'ही' तीन कामं, होणार नाही नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 04:21 PM2022-10-10T16:21:19+5:302022-10-10T16:23:29+5:30

फोन चोरीला गेला किंवा हरवला तर मोठं नुकसान तर होतंच. पण त्यात असलेल्या सिमकार्डचा किंवा डेटाचा कोणी गैरवापर तर करणार नाही ना? असा विचारही आपल्या मनात येतो.

If the phone is stolen or lost do these three things first there will be no damage google android find phone delete data | फोन चोरीला गेल्यास सर्वप्रथम करा 'ही' तीन कामं, होणार नाही नुकसान

फोन चोरीला गेल्यास सर्वप्रथम करा 'ही' तीन कामं, होणार नाही नुकसान

Next

फोन चोरीला गेला किंवा हरवला तर मोठं नुकसान तर होतंच. पण त्यात असलेल्या सिमकार्डचा किंवा डेटाचा कोणी गैरवापर तर करणार नाही ना? असा विचारही आपल्या मनात येतो. यानंतर अनेक जण याबाबत एफआयआर करतात आणि त्यानंतर फोन ट्रॅक करण्याचेही प्रयत्न करतात. परंतु अशातच जर तुम्हाला फोन सापडलाच नाही तर अशात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्यातील डेटा डिलीट करणं.

सिमकार्ड ब्लॉक
तुमचा फोन हरवल्यास, तुम्हाला सर्वप्रथम सिम ब्लॉक करणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणीही तुमच्या नंबरचा गैरवापर करू शकणार नाही. यासाठी तुम्ही टेलिकॉम ऑपरेटरशी संपर्क साधू शकता. तुम्हाला मूलभूत माहिती विचारल्यानंतर ते तुमचे सिम ब्लॉक करतात. नंतर तुम्ही स्टोअरमधून सिम बदलून घेऊ शकता.

फोन ब्लॉक
CEIR ही दूरसंचार विभागाची अधिकृत वेबसाइट आहे. याद्वारे युझरला त्याचा चोरीला गेलेल्या फोनचा तपशील देऊन ब्लॉक किंवा अनब्लॉक करता येतो. यासाठी तुम्हाला www.ceir.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर चोरीला गेलेला किंवा हरवलेल्या फोनचा तपशील भरा आणि तो ब्लॉक करण्याची विनंती दाखल करा. यासाठी एफआयआर कॉपी व्यतिरिक्त तुम्हाला फोन खरेदी करताना मिळालेले बिल, पोलीस तक्रार क्रमांकाचा तपशील अशी काही कागदपत्रे द्यावी लागतील. त्यानंतर फॉर्म सबमिट करा.

रिमोटली डेटा डिलीट करा
जर तुम्ही Android फोन वापरत असाल, तर तुम्ही www.google.com/android/find वर ​​लॉग इन करू शकता. ज्या Google खात्यातून फोनवर लॉग इन केले होते त्यावरून तुम्हाला लॉग इन करावे लागेल. यानंतर तुम्हाला फोनचे डिटेल्स दाखवले जातील. फोन डेटा हटवण्याचा पर्याय निवडून तुम्ही सर्व डेटा हटवू शकता.

Web Title: If the phone is stolen or lost do these three things first there will be no damage google android find phone delete data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.