Zoom अ‍ॅपचा वापर करणाऱ्यांना कंपनी 25 डॉलर देणार, अटी लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 10:57 PM2021-12-06T22:57:50+5:302021-12-06T22:58:09+5:30

Did you use Zoom? एका कंपनीने झूमवर दावा दाखल केला आहे. या कंपनीने झूमच्या युजरना याची मेलद्वारे माहिती दिली आहे.

If you have used Zoom app, you are eligible to get $25 from the company | Zoom अ‍ॅपचा वापर करणाऱ्यांना कंपनी 25 डॉलर देणार, अटी लागू

Zoom अ‍ॅपचा वापर करणाऱ्यांना कंपनी 25 डॉलर देणार, अटी लागू

Next

जर तुम्ही लोकप्रिय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप 'झूम' ची सशुल्क सेवा वापरत असाल आणि तुम्ही मार्च 2016 ते जुलै 2021 दरम्यान या अ‍ॅपची सेवा वापरली असेल, तर तुम्हाला कंपनीकडून $25 (सुमारे 1874 रुपये) ची भरपाई मिळणार आहे.

झूमने आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेशी आणि गोपनीयतेशी तडजोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीवर युजर्सची वैयक्तिक माहिती थर्ड पार्टीसोबत शेअर केल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी त्याच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. हे टाळण्यासाठी कंपनीने $85 दशलक्ष डॉलर देण्याचे मान्य केले आहे.

दुसरीकडे, झूमने हे आरोप नाकारले आहेत, परंतु वाद मिटवण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी ज्या वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती संकटात आली आहे, त्यांना 25 डॉलरची भरपाई देण्याची तयारी दर्शविली आहे. कोरोना काळात झूम अॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. 

वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती कथितपणे विकल्याबद्दल एका कंपनीने झूमवर दावा दाखल केला आहे. या कंपनीने झूमच्या युजरना याची मेलद्वारे माहिती दिली आहे. यामध्ये नुकसान भरपाईच्या दाव्याबाबत सांगितले गेले आहे. जर या ग्राहकांनी 30 मार्च 2016 ते 30 जुलै 2021 या काळात सशुल्क सेवा वापरलेली असेल त्यांनी झूमकडून 25 डॉलर किंवा शुल्काच्या 15 टक्के रक्कम मिळण्याचा दावा करू शकता, असे म्हटले आहे.

काय करावे लागेल?
कंपनीकडून नुकसान भरपाई मिळविण्यासाठी, तुम्हाला दावा फॉर्म भरावा लागेल आणि तो कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड करावा लागेल. भरपाईचे फॉर्म www.ZoomMeetingsClassAction.com वर ऑनलाइन किंवा मेलद्वारे पाठवले जाऊ शकतात. तुम्हाला 5 मार्च 2022 पर्यंत नुकसानभरपाईचा दावा करायचा आहे. 

Web Title: If you have used Zoom app, you are eligible to get $25 from the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.